शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

के.पी.पाटील येत्या चार दिवसात निर्णय घेणार, मुश्रीफांना पाठिंबा देणार?; कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 16:56 IST

राज्यातील राजकीय उलथापालथ राधानगरी विधानसभेच्या मुळावर उठली

शिवाजी सावंत गारगोटी: राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार के.पी.पाटील यांनी मतदारसंघातील राजकीय अडचणी पाहून कोणत्या गटात जायचे हा निर्णय तूर्त स्थगित केला असून येत्या चार दिवसात जाहीर करणार असल्याचे आजच्या मुदाळ येथील बैठकीत जाहीर केले. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता सारीपटात त्यांच्या राजकीय कारकीर्दीची गोची झाली आहे. त्यांची स्थिती "इकडे आड तिकडे विहीर" अशी झाली आहे. तर सामान्य कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.के. पी. पाटील यांनी आपल्या गटाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत दबक्या आवाजात वेगवेगळे सुर उमटत होते.कोणता निर्णय घ्यावा हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर आहे.त्यांचे जवळचे मित्र मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबत जावे तर बिद्री साखर कारखान्याच्या सत्तेचे विकेंद्रीकरण होऊ शकते. कारण अगोदरच ए. वाय. पाटील यांचा स्नेह अजित पवार यांच्याशी असल्याने त्यांचा कल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री मुश्रीफ यांच्या सोबत जाण्याचा आहे. के. पी. पाटील यांनी जर त्यांच्या सोबत न जाण्याचा प्रयत्न केला तर राधानगरी तालुक्यातील सभासद आणि मतदार या दोन्हींना मुकण्याची भीती आहे. के.पी. पाटील यांच्या समोर सद्या बिद्री कारखान्याची निवडणूक असल्याने त्यांची गोची झाली आहे. चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्यात सत्ता मिळविण्यासाठी हसन मुश्रीफ यांच्या सोबत आणखी एखाद्या गटाची म्हणजेच समरजित घाटगे किंवा माजी आमदार संजय घाटगे यातील एका गटाची साथ आवश्यक असते. यांना वगळून कारखान्यावर सत्ता मिळवता येत नाही. ए वाय पाटील यांची नाराजी आताच दूर केली होती तोपर्यंत ही राजकीय उलथापालथी झाल्याने त्यांच्या गटाचे धाबे दणाणले. विधानसभेला अडचणमुश्रीफ यांच्या सोबत गेल्यास कारखाना मिळेल पण विधानसभेला पुन्हा अडचण? प्रकाश आबिटकर हे विद्यमान आमदार असल्याने त्यांना पक्षाने तिकीट दिल्यास आघडीचा धर्म पाळण्यासाठी त्यांना त्यांचा प्रचार करावा लागेल किंवा गप्प बसावे लागेल. के.पी पाटील यांच्या समोर विधानसभा निवडणुक कशी लढायची? हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. ही राजकीय उलथापालथी राधानगरी विधानसभेच्या मुळावर उठली आहे.कार्यकर्ते, पदाधिकारी एकनिष्ठ राहतील?आगामी काळात राजकारण रंगतदार होणार आहे. नेते पळत सुटल्याने उद्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी कितपत पक्षाशी एकनिष्ठ राहतील? हा मोठा प्रश्न आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफK P. Patilके. पी. पाटील