महाराष्ट्रातून येणाऱ्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह येणे अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:47 IST2021-02-21T04:47:22+5:302021-02-21T04:47:22+5:30
महाराष्ट्र आणि केरळमध्ये पुन्हा कोविड रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून कर्नाटक राज्य आरोग्य खात्याने यासंदर्भात खबरदारी म्हणून शनिवारी ...

महाराष्ट्रातून येणाऱ्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह येणे अनिवार्य
महाराष्ट्र आणि केरळमध्ये पुन्हा कोविड रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून कर्नाटक राज्य आरोग्य खात्याने यासंदर्भात खबरदारी म्हणून शनिवारी (दि. 20) नवे आदेश जाहीर केले आहेत. या मार्गदर्शक सूचीनुसार महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांवर कडक नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांची कोविड चाचणी निगेटिव्ह असणे अनिवार्य असल्याचे म्हटले आहे.
कोविड तांत्रिक सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार उपाययोजनांचे पालन करणे आवश्यक आहे. होस्टेल्स, बोर्डिंग, वसतिगृहे अशा ठिकाणी पाचपेक्षा अधिक कोविड पॉझिटिव्ह रुग्ण असतील तर ते ठिकाण ‘कंटेन्मेंट झोन’ म्हणून जाहीर करावे.
स्थानिक आरोग्य प्राधिकरणाद्वारे अशा ठिकाणी विशेष काळजी घेणे आणि नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. ७ दिवसांनंतर कंटेन्मेंट झोनमधील या कर्मचाऱ्यांचीदेखील आरटीपीसीआर चाचणी आवश्यक आहे. मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा वापर अनिवार्य आहे. हॉस्टेल, शैक्षणिक संस्था या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक संस्थांद्वारे कोविड पसरल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संस्था प्रमुखांची असेल. विमान, बस, रेल्वे किंवा खाजगी वाहनातून कर्नाटकात प्रवेश घेणाऱ्या प्रवाशांसाठी ७२ तासांच्या आधीची आरटीपीसीआर चाचणी सर्टिफिकेट चालणार नाहीत. नियमांचे काटेकोर पालन न केल्यास किंवा कोणत्याही नियमाचे उल्लंघन केल्यास कोविडचा उद्रेक पुन्हा कर्नाटकातही होईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे.