टाकळीवाडी येथे कोविड अलगीकरण सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:18 IST2021-06-03T04:18:29+5:302021-06-03T04:18:29+5:30
दत्तवाड : टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथे गुरुदत्त शुगर्स व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त पुढाकाराने सरस्वती हायस्कूलमध्ये पंधरा बेडचे कोविड अलगीकरण ...

टाकळीवाडी येथे कोविड अलगीकरण सेंटर सुरू
दत्तवाड : टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथे गुरुदत्त शुगर्स व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त पुढाकाराने सरस्वती हायस्कूलमध्ये पंधरा बेडचे कोविड अलगीकरण सेंटर सुरू करण्यात आले. या सेंटरचे उद्घाटन नायब तहसीलदार संजय काटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
नायब तहसीलदार काटकर म्हणाले, महापुरासारखी नैसर्गिक आपत्ती, जनावरांमध्ये आलेली लाळ-खुरकतची साथ तसेच कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्याची व प्रशासनाला केलेली मदत ही गुरुदत्त शुगर्सची सामाजिक बांधिलकी आहे. त्यांचे कार्य हे साखर कारखानदारीमध्ये आदर्श निर्माण करणारी असल्याचे त्यांनी सांगितले.
गुरुदत्तचे अध्यक्ष माधवराव घाटगे व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांच्या विशेष मदतीबरोबरच दातृत्वांकडून या सेंटरला मदत करण्यात आली आहे. कार्यक्रमास बबन चौगुले, संजय गायकवाड, जनसंपर्क अधिकारी विकास चौगुले, सरपंच मंगल बिरणगे, उपसरपंच भरत पाटील, तुकाराम चिगरे, बाजीराव गोरे, मुख्याध्यापक संजय तपासे, विनायक माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक योगेश बदामे तर सूत्रसंचालन संजय चौगुले यांनी केले. बी. डी. पाटील यांनी आभार मानले.
फोटो - ०१०६२०२१- जेएवाय- ०९
फोटो ओळ - टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथे कोविड अलगीकरण सेंटरचे उद्घाटन नायब तहसीलदार संजय काटकर यांच्या हस्ते करण्यात आले.