कुडित्रेत कोविड विलगीकरण केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:32 IST2021-06-16T04:32:41+5:302021-06-16T04:32:41+5:30
आज या कोविड केंद्राचे उद्घाटन सरपंच ज्योत्स्ना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कुंभी कासारी कारखान्याचे माजी संचालक मदन ...

कुडित्रेत कोविड विलगीकरण केंद्र सुरू
आज या कोविड केंद्राचे उद्घाटन सरपंच ज्योत्स्ना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कुंभी कासारी कारखान्याचे माजी संचालक मदन पाटील, उपसरपंच राजाराम कदम, कुंभी बँकेचे उपाध्यक्ष अजित पाटील, यशवंत बँकेचे संचालक आनंदा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती
कुडित्रे ग्रामस्थांची महामारीच्या काळात आरोग्याची काळजी घेण्यासाठी ग्रामपंचायत कटिबध आहे. यासाठी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलमधील गाळ काढून स्वच्छ पाणी, जेथे पाणी मिळत नाही तेथे पाईपलाईन बदलण्याचे काम, औषधफवारणी, गटारी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे, असे सरपंच ज्योत्सा पाटील यांनी सांगितले.
या वेळी ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील, तुकाराम शेलार, भारती पाटील, सुवर्णा चौगुले, संभाजी भास्कर, सुवर्णा भास्कर, शीतल खेडकर, आरती कुंभार, युवराज पाटील, के. एम. किरूळकर, रघुनाथ शेलार, पंडित मडके, विशाल खेडकर, एम. डी. राऊत उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी सरदार दिंडे यांनी स्वागत व आभार मानले.