कोविड प्रतिबंधात्मक लस आली अन् संपलीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:25 IST2021-05-07T04:25:48+5:302021-05-07T04:25:48+5:30

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या वतीने गुरुवारी शहरातील ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व सीपीआर रुग्णालयात मिळूण एकूण ३३३३ नागरिकांना ...

Kovid preventive vaccine was introduced | कोविड प्रतिबंधात्मक लस आली अन् संपलीही

कोविड प्रतिबंधात्मक लस आली अन् संपलीही

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या वतीने गुरुवारी शहरातील ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व सीपीआर रुग्णालयात मिळूण एकूण ३३३३ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. लस उपलब्ध नसलेने आज, शुक्रवारी ४५ वर्षावरील नागरीकांचे कोविड लसीकरण बंद राहणार आहे.

गुरुवारी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे ३००, फिरंगाई ३०८, राजारामपुरी १०६, पंचगंगा १४३, कसबा बावडा २६४, महाडिक माळ ४३८, आयसोलेशन ३१९, फुलेवाडी येथे ३७९, सदरबाजार ३२८, सिद्धार्थनगर २१८, मोरेमाने नगर २२४ व सीपीआर हॉस्पिटल येथे ३०६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

महानगरपालिकेकडे लस उपलब्ध नसल्यामुळे आज, शुक्रवारी ४५ वर्षावरील नागरिकांचे कोविड लसीकरण बंद राहणार आहे, परंतु १८ ते ४४ वयोगटातील ज्या नागरिकांनी कोविन पोर्टलवर शुक्रवारची भगवान महावीर दवाखाना विक्रम नगर येथील ऑनलाइन अपॉईंटमेंट घेतली आहे. अशा नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे.

शहरामध्ये आतापर्यंत एक लाख १० हजार ३३८ नागरिकांना पहिल्या डोसचे तर २९ हजार ९८५ नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे. ४५ वर्षावरील ४९ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले.

काही केंद्रावर अरेरावी..

रुईकर कॉलनीतील दत्त मंदिरात असलेल्या लसीकरण केंद्रातून लसीचा दुसरा डोस घ्यायला यावे, असे निरोप गुरुवारी सकाळी ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आले. त्यानुसार लस घ्यायला गेल्यावर मात्र कर्मचाऱ्यांनी लस संपल्याचे जाहीर केले. मग तुम्ही फोन करून या म्हणून का सांगितले अशी दरडावून विचारणा केल्यावर काहीना लस देण्यात आली. या केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांना सकाळपासूनच ताटकळत ठेवल्याचा अनुभव स्थानिक नागरिक सुचेता टक्कळकी यांनी ‘लोकमत’ला कळविला.

Web Title: Kovid preventive vaccine was introduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.