रोज पाच ते सात रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे.
शहर व उपनगरांना लागून असणारी २० गावे हॉटस्पॉट बनली आहेत. याशिवाय नोकरी, प्रशासकीय कामे व व्यवसाय यानिमित्ताने तालुक्यांतील सर्व गावांचा कोल्हापूर शहराशी मोठा संपर्क असल्याने समूह संसर्गाचा परिणाम दिसून येत आहे. शिंगणापूर, उचगाव, पाचगाव, मोरेवाडी, गांधीनगर, निगवे दु., मुडशिंगी, खुपिरे, हणमंतवाडी, नागदेववाडी, बालिंगा यांसह ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.
करवीर तालुक्यातील रोज १५० ते २०० कोरोना बाधितांचा आकडा येत आहे. बाधित रुग्णांची ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यातील खुपिरे ग्रामीण रुग्णालय व नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांत लसीकरणाचे काम सुरू असले तरी गावागावांत लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे.
तालुक्यातील कोविड केंद्रांची संख्या चार आहे. त्यात शिंगणापूर ५७ बेड, कुंभी-कासारी येथे १२० बेड, तर केआयटी कॉलेजमध्येही कोविड केंद्र आहे. गिरगाव व वडणगे येथे सामाजिक कार्यकर्त्यांनी कोविड केंद्र उभारून तालुक्यातील अनेक रुग्णांना दिलासा दिला. मागील वर्षी कोरोना काळात कुरुकली येथे सुरू केलेले कोविड सेंटर बंद आहे. करवीर तालुक्यातील कोविड केंद्रातून ३०० ते ३५० रुग्णांवर सरकारी व खासगी केंद्रातून उपचाराची सोय होत आहे.
खासगी रुग्णालयात ५० हजारांची मागणी
रुग्ण गंभीर असेल तर दाखल करतानाच शहरातील खासगी दवाखान्यात ५० हजार रुपये डिपॉझिटची मागणी होत आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांना शक्य आहे; पण ज्यांची परिस्थिती नाही, अशांना बेड उपलब्ध होत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.