शियेत कोविड सेंंटर उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:22 IST2021-05-10T04:22:55+5:302021-05-10T04:22:55+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शिये गावातील रुग्णसंख्या वाढत आहे. या रुग्णांना गावांत चांगले उपचार मिळावेत यासाठी कोविड सेंटर उभारण्यात येणार ...

शियेत कोविड सेंंटर उभारणार
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शिये गावातील रुग्णसंख्या वाढत आहे. या रुग्णांना गावांत चांगले उपचार मिळावेत यासाठी कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. ग्रामदक्षता कमिटीच्या माध्यमातून मदत गोळा करून कोरोना सेंंटरला इतर सर्व सुविधा पुरवण्यात येणार आहे. यासाठी सर्व सेवा विनामूल्य पुरविणार असल्याची ग्वाही डॉक्टर्स असोसिएशनतर्फे डॉ. विलास सातपुते यांनी दिली.
लॉकडाऊनच्या नियमांचे पालन योग्यरितीने व्हावे आणि कोरोनाचा प्रसार रोखावा यासाठी प्रभागनिहाय टास्क फोर्स तयार करण्यात यावा, अशी सूचना स.पो.नि.किरण भोसले यांनी केली. सुरक्षा आणि बंदोबस्तासाठी पोलीस स्टेशनकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच शिवाजी गाडवे, तंटामुक्त अध्यक्ष सर्जेराव काशीद, शिवसेना जिल्हा उपप्रमुख बाजीराव पाटील, ग्रामसेवक रमेश कारंडे, तलाठी युवराज केसरकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, दक्षता कमिटी सदस्य, डॉक्टर्स, शिक्षक, आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आदी उपस्थित होतेे.
०९ शिये कोविड
फोटो ओळ : शिये (ता. करवीर) येथे झालेल्या कोरोना ग्रामदक्षता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना स.पो.नि. किरण भोसले.