‘केआयटी’च्या विद्यार्थ्यांनी साकारली ‘हॉरी झोन’
By Admin | Updated: September 5, 2014 00:51 IST2014-09-05T00:49:37+5:302014-09-05T00:51:58+5:30
तरुणाईचे ज्ञान : मेरठमधील क्वॉडटोरॅक स्पर्धेत पटकाविला प्रथम क्रमांक

‘केआयटी’च्या विद्यार्थ्यांनी साकारली ‘हॉरी झोन’
कोल्हापूर : मेरठ (दिल्ली) येथे इंडियन सोसायटी आॅफ न्यू ईरा इंजिनिअर्सतर्फे आंतरराज्य ‘क्वॉड टोरॅक-२०१४’ स्पर्धा घेण्यात आली. यात केआयटी कॉलेजच्या अभियांत्रिकी शाखेतील २५ विद्यार्थ्यांच्या संघाने ‘हॉरी झोन’ ही चारचाकी साकारून ‘आॅटोक्रॉस’ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला.
या संघात राजवर्धन पवार (कर्णधार), ओंकार कामत, आकाश लायकर, रजत माने, केदार बडसकर, मयूरेश भोसले, प्रीतम कुलकर्णी, राहुल बेलदार, वैभव पाटील, मोनीष जिरगे, ऋषिकेश मगदूम, ओंकार माने, हितेश भानुषाली, राहिब पटवेगार, चिन्मय देशपांडे, गौरव सांगलीकर, शंतनू भाट, गणेश पोळ, यशोधन सावंत, अक्षय देसाई, ऋतुराज डोंगरे, गुरुनाथ बुरसे, सत्यजित शिंदे, आदम शेख, अनुराग चौगुले यांचा समावेश होता. त्यांना कॉलेजचे विश्वस्त मंडळ, प्राचार्य डॉ. एम. एम. मुजूमदार, मेकॅनिकल शाखेचे प्रमुख एस. एस. माने, ए. एम. कुरेशी यांचे मार्गदर्शन तसेच जाधव इंडस्ट्रीज, राजलक्ष्मी इंडस्ट्रीज, टेक्नोज अँड प्लास्टोज, महालक्ष्मी रिसेलरर्स, व्ही. पी. इंडस्ट्रीज यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)
अशी साकारली चारचाकी
होंडा सीबीआर २५० सी.सी. या दुचाकीचे इंजिन वापरून ‘हॉरी झोन’ ही चारचाकी साकारली आहे. यात अॅक्सेलरेटर ब्रेकिंगचा समावेश केला आहे. दरी-खोऱ्यातून प्रवास करताना अचानक अपघात होऊन ‘हॉरी झोन’ कोणत्याही बाजूस उलटल्यास तिचे इंजिन तातडीने बंद होणारी स्वयंचलित यंत्रणा समाविष्ट केली आहे. (प्रतिनिधी)