कोरे दूध-साखर वाहतूक संस्थेची ७४ कोटींची वार्षिक उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:26 IST2021-09-26T04:26:30+5:302021-09-26T04:26:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क : वारणानगर - तात्यासाहेब कोरे सहकारी दूध-साखर वाहतूक संस्थेने अहवाल सालात ७४ कोटींची वार्षिक उलाढाल ...

कोरे दूध-साखर वाहतूक संस्थेची ७४ कोटींची वार्षिक उलाढाल
लोकमत न्यूज नेटवर्क :
वारणानगर - तात्यासाहेब कोरे सहकारी दूध-साखर वाहतूक संस्थेने अहवाल सालात ७४ कोटींची वार्षिक उलाढाल केल्याची माहिती वाहतूक संस्थेचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी दिली.
तात्यासाहेब कोरे सहकारी दूध साखर वाहतूक संस्थेच्या २७ व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
संस्थेकडे लहान मोठ्या मिळून एकूण २६८ गाड्या असून ७४ कोटींची वार्षिक उलाढाल केली आहे. ढोबळ नफा ३१ लाखांचा झाल्याचेही किशोर पाटील यांनी सांगितले.
संस्थेचे व्यवस्थापक अनिल भोसले यांनी नोटीस वाचन केले. यावेळी व्यासपीठावर दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, अकौंटंस मॅंनेजर सुधीर कामेरीकर, संचालक विजय पाटील, बाळासो बंडगर, तानाजी मगदूम, अविनाश हिरवे, कुलभूषण पाटील, संजय दळवी, सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सभासद उपस्थित होते.
राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर सिनिअर क्लार्क सदाशिव निंबाळकर यांनी आभार मानले.
-
फोटो ओळ - तात्यासाहेब कोरे दूध साखर वाहतूक संस्थेच्या २७ व्या वार्षिक सर्व साधारण सभेत अध्यक्ष किशोर पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर इतर मान्यवर उपस्थित होते.