शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

पेपरफुटीबाबत कोकण मंडळ सतर्क

By admin | Updated: March 10, 2017 23:10 IST

मोबाईल, इंटरनेट वापरावर प्रतिबंध; सहायक परीरक्षकाच्या अधिकारात वाढ

सागर पाटील -- टेंभ्ये --परीक्षेच्या सुरुवातीच्या काळातच मुंबई, अमरावती व पुणे विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत बारावी परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्रकार घडल्यानंतर कोकण मंडळ सतर्क झाले आहे. हा गैरप्रकार थांबविण्यासाठी राज्य मंडळाने कडक उपाययोजना केली आहे. परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक व परीरक्षक यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही घटकाला मोबाईल अथवा तत्सम साधने वापरण्यास सक्त बंधन घालण्यात आले आहे. परीरक्षक कार्यालयातून प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या साहायक परीरक्षकाच्या अधिकारात वाढ करण्यात आली असून, त्यांना बैठ्या पथकाचे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पेपरफुटीसारख्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य मंडळाने परीक्षा केंद्रावर परीक्षा कालावधीत भ्रमणध्वनी, टॅबलेट, अन्य इंटरनेट साधने तसेच डिजिटल घड्याळ वापरावर सक्त निर्बंध घातले आहेत. या साधनांच्या माध्यमातूनच पेपर फोडले जात असल्याने परीरक्षक व केंद्र संचालकाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही घटकाकडे भ्रमणध्वनी अथवा अन्य साधन असणार नाहीत, याची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबतचे परिपत्रक कोकण शिक्षण मंडळाने प्रसिद्ध केले आहे.प्रश्नपत्रिका वितरणाबाबतही अधिक दक्षता घेण्यात येणार आहे. निर्धारित वेळेपूर्वी व आवश्यक कार्यपद्धतीचा वापर न करता प्रश्नपत्रिका पाकिटे उघडली जाऊ नयेत, यासाठी काटेकोर तरतूद करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका केंद्रावर दिल्यापासून उत्तरपत्रिका परीरक्षकाकडे जमा करेपर्यंत सर्व प्रक्रियेचे पूर्णवेळ परीक्षा केंद्रावर थांबून निरीक्षण व नियंत्रण करण्याचे अधिकार साहाय्यक परीरक्षकांना देण्यात आले आहेत. या बाबीचा अहवाल दैनंदिन स्वरूपात परीरक्षकाकडे सादर करणे साहाय्यक परीरक्षकांना बंधनकारक करण्यात आले आहे.यावर घातली आहेत बंधनेपेपरफुटीसाठी आधुनिक सुविधांचा वापर केला जात असल्याने मोबाईल, टॅबलेट किंवा इंटरनेटचा वापर करता येणारी साधने परीक्षा केंद्रावर नेण्यास बंधन घालण्यात आले आहे. तसेच परीक्षा केंद्रावर डिजिटल घड्याळ वापरण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहे.काटेकोर अंमलबजावणी सुरूपेपरफुटीचा गैरप्रकार थांबविण्यासाठी राज्य मंडळाने निश्चित केलेल्या उपाययोजनांची कोकण मंडळाने काटेकोरपणे अंमलबजावणी केली आहे. कोकण मंडळाच्या कार्यक्षेत्रात असा कोणताही गैरप्रकार घडणार नाही, याची सर्व प्रकारची काळजी विभागीय मंडळ व प्रशासकीय यंत्रणा घेत आहे. - डॉ. शकुंतला काळे, अध्यक्ष, कोकण परीक्षा मंडळउशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची होणार नोंदपरीक्षा केंद्रावर सकाळी १०.३० नंतर ११.३० पर्यंत येणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर पेपर फुटला तर सकाळच्या वेळात त्याचे वितरण होऊ शकते. त्यामुळे उशिरा येणाऱ्यांची स्वतंत्र नोंद ठेवली जाणार आहे.