समूहनृत्य स्पर्धेत कोल्हापूरचा विवेकानंद कॉलेज संघ प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:00 IST2021-02-05T07:00:33+5:302021-02-05T07:00:33+5:30
(फोटो) लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : युवा स्पंदन स्पर्धा उपक्रमांतर्गत पदन्यास वैयक्तिक नृत्य आणि समूहनृत्य या दोन्ही स्पर्धांना रसिकांचा ...

समूहनृत्य स्पर्धेत कोल्हापूरचा विवेकानंद कॉलेज संघ प्रथम
(फोटो)
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : युवा स्पंदन स्पर्धा उपक्रमांतर्गत पदन्यास वैयक्तिक नृत्य आणि समूहनृत्य या दोन्ही स्पर्धांना रसिकांचा प्रतिसाद लाभला. समूहनृत्य स्पर्धेत विवेकानंद कॉलेज (कोल्हापूर) संघाने प्रथम क्रमांक, तर वैयक्तिक नृत्य स्पर्धेत सायली सातपुते (इचलकरंजी) या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धा मनोरंजन मंडळ, रोटरी क्लब ऑफ सेंट्रल व श्री दगडूलाल मर्दा फौंडेशनने आयोजित केल्या होत्या.
सुरुवातीला श्यामसुंदर मर्दा व परीक्षकांनी नटराज प्रतिमेचे पूजन केले. समूहनृत्य स्पर्धेतील मयूर कुलकर्णी डान्स अकॅडमी इचलकरंजीच्या कडकलक्ष्मी नृत्यास दि्वतीय, तर शिवश्री नृत्यालय कोल्हापूर संघाच्या भरतनाट्यम नृत्यास तृतीय क्रमांक मिळाला. स्पर्धेतील रे डान्सर्स कोल्हापूर आणि बीट टू बीट डान्स ग्रुप सांगली या संघांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविले. वैयक्तिक नृत्य स्पर्धेत समिधा साळोखे (इचलकरंजी) हिने दि्वतीय, तर शर्मिन मोमीन (इचलकरंजी) हिने तृतीय क्रमांक पटकाविला.
समूहनृत्य स्पर्धेत पदन्यास नृत्यकला अकादमी, राजाराम महाविद्यालय कोल्हापूर, मणेरे ज्युनिअर कॉलेज, डीकेटीई इंग्लिश मिडीयम ज्युनिअर कॉलेज, ए. जी. डान्स स्टुडिओ, एएससी कॉलेज गर्ल्स् ग्रुप आणि युफोरिया व एमडीए ग्रुप यांनी उल्लेखनीय सादरीकरण केले.
परीक्षक म्हणून संग्राम भालकर (कोल्हापूर), महेश पाटील (सांगली) व राजश्री गबाले यांनी काम पाहिले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष संजयसिंह गायकवाड व विमलकुमार बंब यांनी स्वागत केले. समीर गोवंडे यांनी प्रास्ताविक केले.
घोरपडे नाट्यगृहात झालेल्या स्पर्धेसाठी शहर व परिसरातील रसिक उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष आबाळे व प्रतीक जाधव यांनी केले. पंडित ढवळे यांनी आभार मानले.
फोटो ओळी
०१०२०२१-आयसीएच-०३
विवेकानंद कॉलेज (कोल्हापूर) संघाने समूहनृत्य सादर केले.
०१०२०२१-आयसीएच-०४
इचलकरंजीत समूहनृत्य स्पर्धेत विवेकानंद कॉलेज (कोल्हापूर) संघास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते देण्यात आले.