कोल्हापूर : संतोष ट्राॅफी फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी कोल्हापूरच्या निखिल कदम याची निवड करण्यात आली. या स्पर्धेसाठी मंगळवारी महाराष्ट्र संघ जाहीर करण्यात आला. महाराष्ट्राचा कर्णधार बनण्याची कोल्हापूरला प्रथमच संधी मिळाली आहे.महाराष्ट्राच्या संघात निखिल कदमसोबत कोल्हापूरच्या पवन माळी, संकेत साळोखे, अरबाज पेंढारी यांचाही समावेश झाला आहे. शुक्रवार, दि. १३ ऑक्टोबरपासून येथील राजर्षी शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर या फुटबॉल स्पर्धेस प्रारंभ होत आहे. महाराष्ट्राचा पहिलाच सामना अंदमाननिकोबार संघासोबत होणार आहे. या संघाचे मुख्य प्रशिक्षक परेश शिवलकर असून रियाज डिकोस्टा सहप्रशिक्षक आहेत. व्यवस्थापक म्हणून सुनील पुजारी, जय जोशी फिजिओथेरपिस्ट आणि कुणाल सावंत गोलकीपर प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.महाराष्ट्राचा संघ : निखिल कदम (कर्णधार), पवन माळी, अरबाज पेंढारी, संकेत साळोखे (कोल्हापूर), हिमांशू पाटील (उपकर्णधार), अर्फात अन्सारी, जॉन्सन मॅथ्यू, अर्मैश अन्सारी, दीपक पाटील, उमेश पेराम्बा, मल्हार मोहाई, दुर्वेश निजाप (मुंबई), परमजीत सिंग बघेल, (गोंदिया), कामरान अन्सारी, अबिद शेख, यश शुक्ला, मोहोज रिजवान (नागपूर).
संतोष ट्राॅफी: कोल्हापूरचा निखिल कदम महाराष्ट्र संघाचा कर्णधार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 17:16 IST