कोल्हापूरचा मकानदार राज्यात पहिला

By Admin | Updated: March 13, 2015 23:59 IST2015-03-13T23:33:49+5:302015-03-13T23:59:39+5:30

‘पीएसआय’चा निकाल : शिंदेवाडीचा चव्हाण आठवा

Kolhapur's landlord is the first in the state | कोल्हापूरचा मकानदार राज्यात पहिला

कोल्हापूरचा मकानदार राज्यात पहिला

कोल्हापूर : जिद्दीला कष्टांची जोड देत कोल्हापूर जिल्ह्यातील २३ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) झालेल्या पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेत यशाचा झेंडा रोवला. यात सुभाषनगर येथील अर्शद उस्मान मकानदार याने ३४० पैकी २५८ गुण मिळवीत राज्यात प्रथम क्रमांक पटकविला. शिंदेवाडी (ता. तासगाव) येथील अनिरुद्ध चव्हाणने २४५ गुणांसह राज्यात आठवा, तर साजणी (ता. हातकणंगले) येथील धन्वेश पाटीलने २३७ गुणांसह ५२वा क्रमांक मिळविला. या परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी सायंकाळी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर झाला. ‘एमपीएससी’तर्फे आॅगस्ट २०१३ मध्ये पीएसआयची पूर्वपरीक्षा झाली. त्यानंतर डिसेंबरमध्ये मुख्य परीक्षा आणि डिसेंबर २०१४ मध्ये मुलाखती, शारीरिक चाचणी परीक्षा झाली. यात सुभाषनगरमधील अर्शद मकानदार राज्यात अव्वल ठरला. त्याने या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण प्रायव्हेट हायस्कूलमध्ये, महाविद्यालयीन शिक्षण न्यू कॉलेजमध्ये झाले आहे. त्याने वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयातून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी मिळविली आहे. त्याचे वडील कृषी खात्यातून सहायक अधीक्षकपदावरून निवृत्त झाले अ


आई, वडील, काका असे कुटुंबातील सदस्य शासकीय सेवेत आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच या क्षेत्रातच करिअर करण्याचे ध्येय बाळगले होते. दिवसातील आठ ते नऊ तास अभ्यास केला. स्वयंअध्ययनावर भर दिला. त्याचा परिणाम म्हणजे पहिल्याच प्रयत्नात पी. एस. आय. परीक्षेत यशस्वी झालो. - अर्शद मकानदार

Web Title: Kolhapur's landlord is the first in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.