‘सीए’ अंतिम परीक्षेत कोल्हापूरच्या २३ जणांची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:29 IST2021-09-14T04:29:43+5:302021-09-14T04:29:43+5:30
वर्षातून दोनवेळा ‘आयसीएआय’कडून परीक्षा घेतली जाते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ज्या विद्यार्थ्यांची मे महिन्याची परीक्षा रद्द झाली. त्यांच्यासाठी सीए ...

‘सीए’ अंतिम परीक्षेत कोल्हापूरच्या २३ जणांची बाजी
वर्षातून दोनवेळा ‘आयसीएआय’कडून परीक्षा घेतली जाते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ज्या विद्यार्थ्यांची मे महिन्याची परीक्षा रद्द झाली. त्यांच्यासाठी सीए इन्स्टिट्यूटने जुलैमध्ये सामाजिक अंतर, मास्क आणि शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत पुन्हा परीक्षा घेतली. कोल्हापूरमधील २७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ‘आयसीएआय’ने जाहीर केलेल्या निकालानंतर रात्री आठपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार वीस जण उत्तीर्ण झाले. त्यामध्ये राहुल पाटील, आप्पासो बोदगिरे, शिवराज शिंत्रे, मनीषा उभराणी, कौस्तुभ पेडणेकर, सागर रोहिडा, नीरज पागनीस, सुदेश जगताप, अमर खुर्द, साहिल शाह, वैभव चौगुले, अपूर्व गोखले, आरती कमतनुरे, संतोष जाधव, शीतल कदम, प्रणिता दिवटे, अजय मंगलानी, सुतिर्था निल्ले, उज्ज्वला महाडिक, धोडिंबा जाधव यांचा समावेश आहे. त्यांना आयसीएआयच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष तुषार अंतुरकर, उपाध्यक्ष सुशांत गुंडाळे, सचिव चेतन ओसवाल, खजानीस अमित शिंदे, माजी अध्यक्ष अनिल चिकोडी आदींचे मार्गदर्शन लाभले.
प्रतिक्रिया
‘सीए’च्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा खूप आनंद होत आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आई-वडील, कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी यांनी दिलेल्या प्रोत्साहनाच्या बळावर यशस्वी झाले आहे.
-अमृता भोईटे
चौकट
उत्तीर्णतेचे प्रमाण चांगले
कोरोना आणि महापुराच्या संकटाचा सामना करत कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी सीए परीक्षेत मिळविलेले यश कौतुकास्पद आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण चांगले असल्याचे ‘आयसीएआय’च्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष तुषार अंतुरकर यांनी सांगितले.