शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

लकी नंबरसाठी कोल्हापूरकरांनी मोजले साडेचार कोटी, सर्वाधिक पसंदी कोणत्या नंबरला..  वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 15:45 IST

कोल्हापूर : आपल्या वाहनाची वेगळी ओळख असावी. वाहनाच्या क्रमांकावरून व्यक्ती ओळखली जावी, अशी हौस कोल्हापूरकरांची आहे. हौसेला मोल नाही, ...

कोल्हापूर : आपल्या वाहनाची वेगळी ओळख असावी. वाहनाच्या क्रमांकावरून व्यक्ती ओळखली जावी, अशी हौस कोल्हापूरकरांची आहे. हौसेला मोल नाही, असे म्हटले जाते. फॅन्सी क्रमांक मिळविण्यासाठी गेल्या पाच महिन्यांत कोल्हापूरकरांनी ४ कोटी ६४ लाख ८९ हजार ५०० रुपये प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे भरले आहेत.नंबरजी बेरीज ९ आणि ९९९९, ०००९, ००९९ आणि क्रमांक १ मिळविण्यासाठी हौशी कोल्हापूरकरांनी पैसे मोजले आहेत. गेल्या सहा महिन्यांत ६३६० जणांनी फॅन्सी क्रमांक घेतले आहेत.फॅन्सी क्रमांक घेण्यात काही राजकारणी, उद्योजक, व्यावसायिक आणि कार्यकर्तेही आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयात हे क्रमांक मिळत होते. सध्या वाहन विक्री करणाऱ्यांकडेही शुल्क भरून हे क्रमांक मिळतात. एकाच क्रमांकाला अधिक मागणी असेल तर तेथे बोली लावली जाते. ठरावीक क्रमांकाचे शुल्क आरटीओने ठरवून दिली असले तरी तीन लाखांपर्यंतचे शुल्क भरून पसंतीचे क्रमांक घेतले जात आहेत. काही वेळेला दुचाकीचा क्रमांक चारचाकीला घेण्यासाठी जादा रक्कम घेतली जाते.

फॅन्सी नंबरमधून सहा महिन्यांत कोट्यवधींची कमाईफॅन्सी क्रमांकातून आरटीओला सहा महिन्यांत ४ कोटी, ६४ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा महसूल जमा झाला. या क्रमांकातून वर्षाला सरासरी सुमारे १३ कोटींचा महसूल जमा होता. फॅन्सीसाठी सातत्याने मागणी वाढत आहे.

५० ते १ लाखाचे चॉइस नंबर५० ते १ लाख शुल्काच्या चॉइस नंबरसाठी ८ जणांनी पैसे भरले आहेत. त्यातून आरटीओला ५ लाख ६० हजार रुपये रुपये मिळाले आहेत.

सर्वाधिक पसंदी ००१ लासर्वाधिक पसंती क्रमांक ००१ ला आहे. त्यासाठी अडीच ते तीन लाख रुपये हौशी वाहनधारकांनी भरले आहे. या क्रमांकासाठी बोली आहे. मात्र ती कितीही रक्कमेची असली तरी हौसेला मोल नाही.

पसंती क्रमांकातून कार्यालयाला महसूल मिळत आहे. काही वाहनधारकांची लकी नंबरसाठी सातत्याने मागणी आहे. त्यांना नियमानुसार शुल्क आकारून संबंधित क्रमांक दिला जातो. -विजय इंगवले, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRto officeआरटीओ ऑफीस