शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

नववर्षाच्या स्वागताची कोल्हापूरकरांकडून जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:17 IST

नववर्षाचे स्वागत करण्याचे आणि सरत्या वर्षाला निरोप देण्याचे क्षण अविस्मरणीय करण्यासाठी कोल्हापूरकरांनी जय्यत तयारी केली आहे. विविध स्वरुपातील नियोजन त्यांनी केले आहे. ‘थर्टी फर्स्ट’च्या मंगळवारी होणाऱ्या पार्टीसाठी शहरासह जिल्ह्यातील विविध हॉटेल्स् सज्ज झाली आहेत.

ठळक मुद्देनववर्षाच्या स्वागताची कोल्हापूरकरांकडून जय्यत तयारीविविध स्वरुपातील नियोजन; ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्टीसाठी हॉटेल सज्ज

कोल्हापूर : नववर्षाचे स्वागत करण्याचे आणि सरत्या वर्षाला निरोप देण्याचे क्षण अविस्मरणीय करण्यासाठी कोल्हापूरकरांनी जय्यत तयारी केली आहे. विविध स्वरुपातील नियोजन त्यांनी केले आहे. ‘थर्टी फर्स्ट’च्या मंगळवारी होणाऱ्या पार्टीसाठी शहरासह जिल्ह्यातील विविध हॉटेल्स् सज्ज झाली आहेत.शहरातील रंकाळा, पंचगंगा नदीघाट, पिकनिक पॉर्इंट, बाग-बगीचासह हॉटेल, फास्टफूड रेस्टॉरंटमध्ये मित्र-मैत्रिणी, नातेवाईक अथवा कुटुंबीयांसमवेत नववर्षाचे स्वागत करण्याचे नियोजन केले आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करणारे फलक शहरातील प्रमुख चौक आणि मार्गावर झळकले आहेत.

शहरासह जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक, काही इव्हेंट संस्थांनी विविध स्वरूपातील पार्टींचे आयोजन केले आहे. हॉटेल व्यावसायिक ग्राहकांना लज्जतदार जेवणाचा आस्वाद देण्यासाठी सज्ज झाले आहेत. या दिवसासाठी काही स्पेशल डिशेस बनविण्यात आल्या आहेत.

आइस्क्रीम पार्लर, केक शॉपी, न्यू इयर पार्टीसाठी सज्ज झाल्या आहेत. बच्चेकंपनीसाठी चॉकलेट हाऊसमध्ये विशेष योजना जाहीर केल्या आहेत. नववर्षाच्या स्वागताचे नियोजन, थर्टी फर्स्टच्या पार्टीचे आयोजनाबाबतच्या व्हॉटस् अ‍ॅपवरील ग्रुप चर्चा रंगत आहेत. त्यात अगदी जेवणाचा मेन्यू ते जल्लोष करण्याच्या ठिकाणापर्यंत चर्चा होत आहे. काही ग्रुपवर थर्टी फर्स्टबाबतच्या मनोरंजनात्मक संदेशांची देवाण-घेवाण सुरू आहे.

स्वागताला विधायक उपक्रमांची किनारकोल्हापूरमधील काहींनी अक्कलकोट, शिर्डी, पंढरपूर, गणपतीपुळे अशा धार्मिक ठिकाणी जाण्याचे ठरविले आहे. त्यानुसार काहीजण सोमवारी रवाना झाले आहेत. येथील अक्षरदालन आणि निर्धार यांच्यावतीने आज, मंगळवारी सायंकाळी पाच वाजता काव्यवाचन आणि दुग्धपान असा संयुक्त कार्यक्रम होणार आहे. कोळेकर तिकटी येथील ‘अक्षरदालन’च्या कार्यालयातील या कार्यक्रमात कोल्हापूरसह विविध परिसरातील कवी सहभागी होणार आहेत.

आज रात्री बारापर्यंत उद्याने खुलीनववर्षाच्या स्वागतानिमित्त नागरिकांना सहभोजनाचा आनंद घेता यावा, म्हणून महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व उद्याने आज, मंगळवारी रात्री बारावाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रंकाळा तलाव उद्यान, पदपथ, पद्माराजे, नाळे, शेळके, पद्मावती, मंगेशकर, नेहरू बालोद्यान, रंकाळा चौपाटी, शाहू उद्यान, राजाराम हॉल उद्यान, दादासोा शिर्के, महावीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, नाना-नानी पार्क, ताराबाई पार्क, लालबहाद्दूर शास्त्री उद्यान, मुक्त सैनिक, रुईकर ओपन, सम्राटनगर, टेंबलाई, श्रीराम, हुतात्मा पार्क उद्यान, आदी उद्याने रात्री १२ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत. 

 

टॅग्स :31st December party31 डिसेंबर पार्टीkolhapurकोल्हापूर