शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

प्रोमो रन’मध्ये धावले कोल्हापूरकर, उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘लोकमत कोल्हापूर महामॅरेथॉन’चा वाजला बिगुल; आता प्रतीक्षा १८ फेब्रुवारीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 12:59 IST

करवीरवासीयांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘लोकमत’ आयोजित ‘कोल्हापूर महामॅरेथॉन’चा रविवारी बिगुल वाजला. महामॅरेथॉनची रंगीत तालीम असणाऱ्या ‘प्रोमो रन’मध्ये आबालवृद्ध उत्स्फूर्तपणे धावले. उत्साही वातावरण, नेटक्या नियोजनाने स्पर्धेमध्ये रंगत आणली.

ठळक मुद्देप्रोमो रन’मध्ये धावले कोल्हापूरकर, उत्स्फूर्त प्रतिसाद ‘लोकमत कोल्हापूर महामॅरेथॉन’चा वाजला बिगुलआता प्रतीक्षा १८ फेब्रुवारीची

कोल्हापूर : करवीरवासीयांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘लोकमत’ आयोजित ‘कोल्हापूर महामॅरेथॉन’चा रविवारी बिगुल वाजला. महामॅरेथॉनची रंगीत तालीम असणाऱ्या ‘प्रोमो रन’मध्ये आबालवृद्ध उत्स्फूर्तपणे धावले. उत्साही वातावरण, नेटक्या नियोजनाने स्पर्धेमध्ये रंगत आणली.अ‍ॅथलेटिक्स खेळाला प्रोत्साहन, आरोग्य संवर्धनाचा संदेश देण्यासाठी लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे दि. १८ फेब्रुवारीला कोल्हापुरातील सर्वांत मोठी हाफ महामॅरेथॉन होणार आहे. या स्पर्धेची पूर्वतयारी आणि वातावरण निर्मितीसाठी रविवारी ‘प्रोमो रन’ घेण्यात आली.

सकाळी पावणेसात वाजता पोलीस ग्राउंड येथून पाच आणि दहा किलोमीटरच्या प्रोमो रनचा फ्लॅग आॅफ महापौर स्वाती यवलुजे, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या हस्ते झाला.

यावेळी महामॅरेथॉनच्या संयोजिका रुचिरा दर्डा, ‘लोकमत’ चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, आशिष जैन, संजय पाटील, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. संजय देसाई, डॉ. संदीप पाटील, आयएम फिट क्लबचे महेश शेळके, महेंद्र ज्वेलर्सचे कुशल ओसवाल, कोल्हापूर जिल्हा अमॅच्युअर अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे एस. व्ही. सूर्यवंशी, कोल्हापूर स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष उदय पाटील प्रमुख उपस्थित होते.

दरम्यान, पोलीस ग्राउंड येथे पहाटे पाच वाजल्यापासून शहरवासीय, धावपटू येऊ लागले. काही वेळातच त्यांची गर्दी वाढली. गीत-संगीताच्या तालावरील ‘झुम्बा डान्स’च्या माध्यमातून वॉर्म अप करून नागरिक, धावपटू हे प्रोमो रनसाठी सज्ज झाले. स्पर्धेच्या प्रारंभाच्या ठिकाणी साताऱ्याच्या रणरागिणी ढोल-ताशा पथकाच्या वादकांनी धावपटूंचा उत्साह वाढविला.

या रनमध्ये आबालवृद्ध, शहरवासीय धावपटूंसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभाग घेतला. काहीजण आपले कुटुंबीय, तर मित्र-मैत्रिणींसमवेत स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांना स्पर्धेच्या मार्गावर थांबलेले अन्य मित्र-मैत्रिणी, कुटुंबीय, नातेवाईक मोठ्या उत्साहाने चीअर-अप करीत होते.

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय दर्जाच्या होणाऱ्या ‘कोल्हापूर महामॅरेथॉन’ची झलक धावपटूंना प्रोमो रनच्या माध्यमातून दिसून आली. नेटके नियोजन, सुसज्ज व्यवस्थेवर सहभागी स्पर्धकांनी समाधान व्यक्त करीत आता आम्ही महामॅरेथॉनच्या प्रतीक्षेत असल्याची समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केली.

नेटके नियोजन, सुसज्ज व्यवस्थाकोल्हापूर महामॅरेथॉनची पूर्वतयारी असणाऱ्या प्रोमो रनसाठी ‘लोकमत’ने सुसज्ज व्यवस्था आणि नेटके नियोजन केले होते, याबद्दल धावपटूंनी समाधान व्यक्त केले. पाच आणि दहा किलोमीटरच्या मार्गांना जोडले जाणारे सर्व रस्ते लोखंडी अडथळे उभारून बंद केले होते. रस्त्यावर दिशादर्शक, मार्गदर्शक फलक लावले होते. स्पर्धेच्या मार्गावरील प्रत्येक किलोमीटरवर ‘लोकमत’चे स्वयंसेवक उपस्थित होते. ते धावपटूंना एनर्जी ड्रिंक, पाणी हातात देत होते. त्यासह त्यांना ‘चिअर-अप’ करीत होते.

पोलिसांचे सहकार्यया प्रोमो रनच्या मार्गावर धावपटूंना वाहनांच्या अडथळ्याला तोंड द्यावे लागू नये, याची दक्षता शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यानी घेतली. पहाटे साडेचार वाजल्यापासून ते स्पर्धेच्या मार्गावर थांबून होते. स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी त्यांचे मोठे सहकार्य लाभले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरLokmat Eventलोकमत इव्हेंटSportsक्रीडा