८ वर्षांच्या मुलांपासून ७६ वर्षांचे वृद्धही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:50 AM2018-01-22T00:50:12+5:302018-01-22T00:50:25+5:30

76-year-old from 8-year-olds! | ८ वर्षांच्या मुलांपासून ७६ वर्षांचे वृद्धही!

८ वर्षांच्या मुलांपासून ७६ वर्षांचे वृद्धही!

Next


कोल्हापूर : उगवत्या सूर्यनारायणाच्या साक्षीने रविवारी कोल्हापूरकर आरोग्यासाठी धावले. त्यांनी ‘प्रोमो रन’मध्ये सहभागी होऊन कोल्हापुरात १८ फेब्रुवारीला होणाºया महामॅरेथॉनसाठी ‘है तयार हम’ असल्याचे दाखवून दिले.
‘रन फॉर युवरसेल्फ’ अशी साद देत ‘लोकमत’ने महामॅरेथॉन आयोजित केली आहे. त्याची रंगीत तालीम असलेल्या प्रोमो रनमध्ये आठ वर्षांच्या मुलांपासून ७६ वर्षांच्या वृद्धांपर्यंतच्या व्यक्तींचा समावेश होता. ज्येष्ठ धावपटूंचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा होता. सहभागी धावपटूंनी रविवारी आपल्या क्षमतेची कसोटी पाहिली. अनेकांनी ‘महामॅरेथॉन’ पूर्ण करून विजेतेपदाला गवसणी घालण्याचा या प्रोमो रनमध्ये निर्धार केला. उत्साही वातावरणामुळे महामॅरेथॉनबद्दल अनेक धावपटूंना उत्सुकता लागून राहिली आहे. या रनसाठी जिल्हा अमॅच्युअर अ‍ॅथलेटिक्स असो.च्या पंच कमिटीचे सहकार्य महत्त्वाचे ठरले. यात पदाधिकारी डॉ. सुरेश फराकटे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते एस. व्ही. सूर्यवंशी, सयाजीराव पाटील, महेश सूर्यवंशी, सीमा सूर्यवंशी, सचिन पांडव, विक्रम शेलार, प्रथमेश उलपे, संकेत पाटील, आर. डी. पाटील, कृष्णात लाड, दिग्विजय मळगे, अभिजित पोवार, निखिल चौगुले, स्वप्निल येवले, विजय पडवळ, अभिजित भोपळे, लहू अंगाज, डी. सी. पाटील, प्रज्योत चौगुले, सचिन कोरवी यांचा समावेश होता.
उत्साही वातावरण
तुतारीचा निनाद, ढोल-ताशांचा कडाकडाट, पाश्चिमात्य गीत-संगीताची धून, धावपटूंची गर्दी असे उत्साही वातावरण स्पर्धेच्या ठिकाणी होते. ‘रन रन रन... भागो रे... भागो रे...’, या ‘कोल्हापूर मॅरेथॉन’च्या विशेष गीताने यात आणखीनच रंगत आणली. ‘प्रोमो रन’पूर्वी फिजिओथेरपिस्ट डॉ. प्रांजली धामणे यांनी धावताना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले. यानंतर ‘सायक्लोन डान्स’च्या कलाकारांनी ‘झुम्बा’द्वारे उपस्थितांचे वॉर्म अप करून घेतले. प्रल्हाद पाटील यांनी बहारदार निवेदन केले.
विजेते असे
१० किलोमीटर खुला गट (पुरुष, विजेत्यांची नावे अनक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, चौथा, पाचवा) : प्रदीप बाजीराव शिंदे, अंकुश संजय पाटील (कोल्हापूर), आनंदा पंडित मार्इंगडे, राजाराम बाबासाो खोंदल ( शाहूवाडी), गुरुप्रसाद नंदकुमार जाधव (कोल्हापूर).
५ किलोमीटर खुला गट (पुरुष) : पवन पोपट पाटील (भुये), अभिलाष भगवान पाटील (पेठवडगाव), योगेश सीताराम गुरव (घुंगुरवाडी), राहुल आनंदा कदम (कोल्हापूर), नीलेश नंदकुमार सकटे (इस्लामपूर).
महिला गटातील विजेत्या : १० किलोमीटर : महिला गट : डॉ. प्रांजली धामणे, डॉ. सुमती कुलकर्णी, पद्मजा पाटील, माणिक पाटील (कोल्हापूर).
५ किलोमीटर : कनम इंगळे, पूजादेवी साखरे, लक्ष्मी गुरव, सुजाता कोळेकर, साक्षी पुंदीकर.

Web Title: 76-year-old from 8-year-olds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.