शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोल्हापूरकर रविवारी जल्लोषात धावले ; ‘लोकमत महामॅरेथॉन’ला मिळाला कमालीचा प्रतिसाद

By संदीप आडनाईक | Updated: January 28, 2024 12:47 IST

रविवारची पहाट कोल्हापूरकरांसाठी जोश, सळसळता उत्साह घेऊन आली

संदीप आडनाईक, कोल्हापूर: लोकप्रियतेच्या शिखरावर पोहाेचलेल्या आणि प्रत्येक वर्षी कमालीची उत्कंठा वाढविणाऱ्या ‘लोकमत’महामॅरेथॉनच्या कोल्हापुरातील सातव्या पर्वातील चौथ्या स्पर्धेत रविवारी राज्यभरातून आलेले हजारो स्पर्धक अगदी ‘मनमुराद’ धावले. या महामॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने बोचऱ्या थंडीतील प्रसन्न वातावरणात स्पर्धकांसह क्रीडा रसिक, शालेय विद्यार्थी, झांजपथकांनी एक सळसळता उत्साह निर्माण केला आणि हा क्षण एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवला. व्यावसायिक धावपटूंबरोबरच, हौशी धावपट्टूंचा विशेषत: महिला व लहान मुलांचा सहभाग लक्षवेधी ठरला.

उत्कंठावर्धक, लक्षवेधी, जोश, उत्साह अशा विशेषणांनी ‘लोकमत’चा हा इव्हेंट क्रीडा रसिकांच्या स्मरणात दीर्घकाळ राहतो. त्याचीच प्रचिती रविवारच्या महामॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा कोल्हापूरकरांना आली. ‘लोकमत’ने आवाहन करताच हजारो खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. ‘कर दे धमाल’ अशी यंदाची टॅगलाइन असलेल्या या स्पर्धेला क्रीडा रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. 

रविवारची पहाट कोल्हापूरकरांसाठी जोश, सळसळता उत्साह घेऊन आली. एरवी शांत असणारे रस्ते पहाटे साडेचार वाजल्यापासून खेळाडू, नातेवाईक, क्रीडा रसिकांच्या गर्दीने गजबजून गेले. त्यामुळे पोलिस कवायत मैदानावरील शांतता खेळाडूंच्या लगबगीने, ढाेल- ताशाच्या गजराने भंगली. मैदानावरील चैतन्यमय वातावरण पाहून खेळाडू, त्यांचे नातेवाईक भारावून गेले. ‘बिनधास्त’ धावण्यासाठी सज्ज झाले. प्रत्यक्ष धावण्यापूर्वी खेळाडूंनी गाणी तसेच संगीताच्या ठेक्यावर वॉर्मअप केला.अखेर उत्कंठा संपली....सकाळी सहा वाजता २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉनला उपस्थित मान्ववरांची झेंडा दाखविला. हाफ मॅरेथॉन ही व्यावसायिक धावपट्टूंसाठी असल्याने पाच...चार...तीन...दोन... एक असे म्हणत झेंडा दाखविताच क्षणाचाही विलंब न करता धावपट्टूंनी आपल्या लक्ष्याच्या दिशेने धाव घेतली. या गटात राज्यभरातील विविध शहरात होणाऱ्या महामॅरेथॉन स्पर्धेतील स्पर्धकही भोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यानंतर अर्ध्या तासाने दहा किलोमीटर पॉवर रनला सुरुवात झाली.मान्यवरांची उपस्थितीपालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येरुडकर, डॉ. उद्धव भोसले (एमआयटी पुणे), गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित कदम, वारणा दूध संघाचे संचालक शिवाजी जंगम, राजवर्धन मोहिते, एन आर पाटील, अभिजित पाटील, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, सिद्धीविनायक रुग्णालयाचे संचालक डॉ. संदीप पाटील, सुंदर बिस्किट्सचे संचालक विक्रम सेठीया, वितरक सेवाक्रम दुल्हणी,आयकाँन स्टीलचे संचालक उन्मेष राठी, भारत पाटील, गोकुळचे संचालक चेतन नरके, डॉ. मिलिंद हिरवे, संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, डॉ. मंजिरी देसाई,पार्वती स्टीलचे शाहू जाधव,  सोसायटी टीचे मार्केटिंग हेड क्षितिज तांडेल, सिध्दिविनायक हॉस्पिटलचे डॉ. संतोष पाटील, रेडिओ मिरचीचे आरजे मनिष आपटे, सहाय्यक उपाध्यक्ष मकरंद देशमुख, इव्हेंटचे महाराष्ट्र, गोव्याचे हेड रमेश डोडवाल, रेस डायरेक्टर संजय पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

हौशी धावपट्टूंनी वाढविली रंगतस्पर्धेतील पाच किलोमीटर फन रन आणि तीन किलोमीटर फॅमिली रनमध्ये मोठ्या संख्येने स्पर्धकांनी भाग घेतला. या दोन्ही गटात तीन वर्षांपासून सत्तरी गाठलेल्या स्पर्धकांनी भाग घेताना ‘हम भी फिट है’ याची साक्ष देत धावले. या गटात अनेक कुटुंबातील आई, वडील, मुले असा एकत्रित भाग घेत धावण्याचा आनंद लुटला. कधी धावत, तर कधी चालत जात त्यांनी स्पर्धेचे अंतर पूर्ण करत उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेत शासकीय, महानगरपालिका, पोलिस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही धावण्याचा मोह आवरला नाही. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही स्पर्धा पूर्ण करत आपली शारीरिक तंदुरुस्ती सिद्ध केली.जोश वाढविणारे वातावरणचारही गटातील स्पर्धेच्या मार्गावरील वातावरण जोश वाढविणारे होते. चौकाचौकात, प्रमुख रस्त्यावर झांजपथक, लहान मुलांचा बँडपथक, ढोल- ताशे पथक, लेझीम पथकातील वादकांनी वाद्यांचा दणदणाट करीत स्पर्धकांना ‘चीअरअप’ केले. फुले उधळत विद्यार्थ्यांनी तर ठिकठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या क्रीडाशौकिनांनी टाळ्यांच्या गजरात प्रोत्साहित केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarathonमॅरेथॉन