शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुलाखतीदरम्यान कोल्हापुरी चप्पलची बदनामी, पुण्यातून बोलावून विचारला जाब - video

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 16:44 IST

अखेरीस अनुराग कोकितकर यांनी माफी मागितली

कोल्हापूर : कोल्हापुरी चप्पलची मुलाखतीदरम्यान बदनामी केल्याच्या तक्रारीवरून येथील चप्पल व्यावसायिकांनी पुण्यात चप्पल व्यवसाय करणारे अनुराग कोकितकर यांना मंगळवारी कोल्हापुरात बोलावून जाब विचारला. अखेरीस कोकितकर यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली.‘प्राडा’ कंपनीने कोल्हापुरी चप्पलची नक्कल करत इटली येथील प्रदर्शनात ती सादर केली. तिचा तिथे अनेकांनी वापरही केला. याबाबत कोल्हापूरच्या कारागिरांना श्रेय देण्याचेही सौजन्य कंपनीने दाखवले नव्हते. यावर संताप व्यक्त होताच कंपनीने आपली चूक मान्य केली. या पार्श्वभूमीवर गेले दहा-बारा दिवस विविध माध्यमांवर कोल्हापुरी चप्पलबद्दल चर्चा, मुलाखती सुरू असताना मूळचे कोल्हापूरचे पण पुण्यात कोल्हापुरी चप्पलचे ब्रॅण्डिंग आणि विक्री करणारे अनुराग कोकितकर यांनी दिलेल्या मुलाखतीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेल्या चप्पल लाइनच्या कोल्हापुरी चप्पल बनावट असल्याचा आरोप केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी प्राडा कंपनीचे समर्थन केल्याने कोल्हापूरचे चप्पल व्यावसायिक संतप्त झाले.त्यांनी कोकितकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना कोल्हापुरात येण्यास सांगितले. त्यांना दुपारी साडेबाराच्या सुमारास चप्पल लाइनच्या एका दुकानात बोलावून या प्रकाराबद्दल जाब विचारण्यात आला. यावेळी खडाजंगी झाल्यानंतर कोकितकर यांनी माफी मागितली. यापुढे कोल्हापुरी चप्पलची बदनामी सहन करणार नसल्याचा इशारा कोल्हापूर फुटवेअर असोसिएशन, छत्रपती शिवाजी मार्केट चप्पल लाइन व्यावसायिकांनी दिला आहे.