शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे ‘जे.पी.नाईक माझी शाळा, समृद्ध शाळा’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 17:50 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने ‘डॉ. जे. पी. नाईक माझी शाळा, समृद्ध शाळा’ अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण समितीचे सभापती अंबरिश घाटगे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा परिषदेचे ‘जे.पी.नाईक माझी शाळा, समृद्ध शाळा’ अभियानअंबरिश घाटगे यांची माहिती, ७ लाख ३४ हजारांची बक्षिसे

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने ‘डॉ. जे. पी. नाईक माझी शाळा, समृद्ध शाळा’ अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण समितीचे सभापती अंबरिश घाटगे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या अभियान स्पर्धेत यशस्वी शाळांना ७ लाख ३४ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असल्याचेही सांगितले.या नव्या योजनेची माहिती देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला प्रभारी शिक्षणाधिकारी रविकांत आडसूळ व शिक्षण समितीचे सदस्य उपस्थित होते.अंबरिश घाटगे म्हणाले, जिल्हा परिषद शाळांचा दर्जा वाढावा, गुणवत्ता वाढावी, भौतिक सुविधांमध्येही वाढ व्हावी या हेतूने हे अभियान घेण्यात येत असून यासाठी जिल्हा, तालुका आणि जिल्हा परिषद गटस्तरीय समिती नेमण्यात आल्या आहेत. १८ जुलै ते ३१ आक्टोबर २0१८ या कालावधीत राबवलेल्या उपक्रमांचा आढावा घेऊन त्यातून विजेत्या शाळांची निवड करण्यात येणार आहे.सर्व शाळांनी स्वयंमूल्यांकन करावयाचे असून ५ नोव्हेंबर ते डिसेंबर २0१८ या कालावधीत वेळापत्रकानुसार हे मूल्यांकन होऊन विजेत्या शाळांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. पंचायत समिती गण स्तरावरील प्राथमिक आणि उच्च प्राथमिक गटातील पहिल्या क्रमांकाला चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.तालुकास्तरीय दोन्ही विभागातील पहिल्या प्रत्येकी ३ शाळांना अनुक्रमे १0 हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तर जिल्हा स्तरावरील प्राथमिक आणि उच्च प्राथमिक गटातील पहिल्या प्रत्येकी ३ शाळांना अनुक्रमे ५१ हजार, ३१ हजार व २१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

भौतिक व शैक्षणिक गुणवत्ता या विषयासाठी १६0 आणि अभियान कालावधीत राबवलेल्या उपक्रमांसाठी १४0 गुण अशी एकूण ३00 गुणांची ही स्पर्धा होणार आहे. १९ निकषांच्या आधारे ही निवड करण्यात येणार आहे. यावेळी शिक्षण समिती सदस्य प्रा. अनिता चौगुले, विनायक पाटील, रसिका पाटील, वंदना जाधव, प्रसाद पाटील, रवी पाटील, उपस्थित होते. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर