शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

यशवंत पंचायत राज अभियानामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात दुसरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 17:17 IST

महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०१८/१९ सालामधील कामगिरीवर आधारित यशवंत पंचायत राज अभियानामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यामध्ये दुसरा तर गडहिंग्लज पंचायत समितीने पुणे विभागामध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. या दोन्ही संस्थांना अनुक्रमे २० लाख आणि ८ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात दुसरीगडहिंग्लज पं.स. पुणे विभागात दुसरी

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०१८/१९ सालामधील कामगिरीवर आधारित यशवंत पंचायत राज अभियानामध्ये कोल्हापूरजिल्हा परिषदेने राज्यामध्ये दुसरा तर गडहिंग्लज पंचायत समितीने पुणे विभागामध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. या दोन्ही संस्थांना अनुक्रमे २० लाख आणि ८ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.गतवर्षी कोल्हापूर जिल्हा परिषदेने स्वयं मूल्यमापनाद्वारे शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार मूल्यमापन आणि प्रत्यक्ष पाहणी झाल्यानंतर पुणे विभागात कोल्हापूर जिल्हा परिषद पहिली आली होती. त्यानंतर २८ जानेवारी २०२० रोजी राज्यस्तरीय समितीने जिल्हा परिषदेची तपासणी आणि पडताळणी केली होती.सामान्य प्रशासन विभागाकडील प्रशासकीय कामकाज, सभा कामकाज, कर्मचारी सेवा, निलंबन, निवृत्तिवेतन प्रकरणे, लोकायुक्त प्रकरणे, महिला बालकल्याण, आरोग्य, पाणी व स्वच्छता, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी, बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, समाजकल्याण, वित्त, ग्रामपंचायत, पशुसंवर्धन, शिक्षण या सर्व विभागांच्या योजनांची दखल घेत एकूण कामकाज पाहून राज्यातील हा दुसरा क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेला नुकताच केंद्र शासनाचा पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरणाचा ५० लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला असून त्यापाठोपाठ हा पुरस्कार जाहीर झाल्याने जिल्हा परिषदेत आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि गावपातळीवरील कर्मचारी, पदाधिकारी यांनी एकदिलाने काम केल्याने आमचा हा गौरव झाला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली याच पद्धतीने जिल्हा परिषद प्रगती करत राहील.बजरंग पाटीलअध्यक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूर 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर