शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

कोल्हापूर जिल्हा परिषद : किरण लोहार यांच्या चौकशीसाठी एकसदस्यीय समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 12:56 IST

माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास यांची एकसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देकिरण लोहार यांच्या चौकशीसाठी एकसदस्यीय समितीअमन मित्तल, रवी शिवदास देणार शिक्षण समितीला अहवाल

कोल्हापूर : माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास यांची एकसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी ही माहिती दिली.जिल्हा परिषदेच्या नुक त्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये लोहार यांच्या कारभाराबाबत जोरदार तक्रारी करण्यात आल्या. अनेक सदस्यांनी उदाहरणे देऊन त्यांच्या कामकाजाची पद्धत योग्य नसल्याचे सांगत चौकशीची मागणी केली होती. यावेळी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशी करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते.यानंतर किरण लोहार हे दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेत आले होते. मात्र तेथे काम करण्यास त्यांना शिवदास यांनीच अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या सूचनेवरून मजजाव केला होता. मात्र सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नसल्याने याबाबत लोहार यांना लेखी आदेश देणे अडचणीचे ठरले होते.या पार्श्वभूमीवर शिवदास यांच्या एकसदस्यीय समितीच्या माध्यमातून लोहार यांची चौकशी होणार असून, यानंतर शिवदास आपला अहवाल शिक्षण समितीला देणार आहेत. या अहवालावर शिक्षण समिती सभापती आणि सदस्य चर्चा करून अंतिम अहवाल अध्यक्षांना सादर करणार आहेत. यानंतर हा अहवाल सभागृहापुढे सादर करण्यात येणार आहे. त्यांच्याबाबत ज्या तक्रारी प्राप्त आहेत, याबाबत ही चौकशी केली जाणार आहे.तीन सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा तसेच पंचायत राज समिती दौऱ्यावेळी अनुपस्थित राहिल्यावरूनही लोहार यांना नोटिसा काढण्यात आल्या होत्या. सर्वसाधारण सभेत लोहार यांच्यावर गंभीर आरोप झाल्याने अखेर त्यांच्या चौकशीसाठी मंगळवारी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा आदेश निघण्याची शक्यता असून, त्यामध्ये किती कालावधीत ही चौकशी केली जाणार आहे, हे समजून येणार आहे.

माध्यमिक शिक्षणाधिकारी लागोपाठ चौकशीच्या फेऱ्यातयाआधीच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यादेखील वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून या विभागातील दोन वरिष्ठ कर्मचारी, अधिकाऱ्यांना दोन वर्षांपूर्वी पकडले होते. यानंतर तत्कालीन सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांनी या विभागाची चौकशी लावली होती. शिंदे यांच्यानंतर नियुक्त झालेले लोहार यांचीही आता चौकशी होणार असल्याने हा विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर