कोल्हापूर : पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापतींची निवड पुढील आठवड्यात, तर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. कारण बुधवारअखेरपर्यंत ग्रामविकास विभागाने या निवडींबाबत कोणतेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले नाहीत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!७ फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदान झाले आणि ९ फेब्रुवारीला निकाल लागला. निकाल लागून दहा दिवस झाले आहेत. परंतु पदाधिकारी निवडीबाबत अजूनही कोणतेही निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेले नाहीत. आज, गुरुवारी शासकीय सुट्टी असून, पुन्हा दोन दिवस साप्ताहिक सुट्ट्या आहेत. पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतिपदासाठीची आधी निवडणूक होणार असून, त्यासाठीही अजूनही निर्देश नाहीत. ते जरी आले तरी फेब्रुवारीअखेरपर्यंत या निवडणुका पार पडतील.त्यानंतर निर्देश आले तर पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटिसा काढाव्या लागतील. नोटिसीचा अवधीचा विचार करता या दोन्ही पदांसाठी मार्चमध्येच निवडणुका होण्याची शक्यता आहे.
राजकीय पेच हेच कारणराज्यातील १२ जिल्हा परिषदांचे निकाल लागले तरी अजूनही या निवडीसाठी निर्देश आलेले नाहीत. सांगली आणि साताऱ्यासह अन्य काही ठिकाणी भाजपला वगळून सत्ता स्थापन करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यामुळे पदाधिकारी निवडीसाठी विलंब होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Web Summary : Kolhapur Zilla Parishad president/vice-president elections likely in March. Panchayat Samiti elections expected next week due to delayed instructions. Political maneuvering delaying the process.
Web Summary : कोल्हापुर जिला परिषद अध्यक्ष/उपाध्यक्ष चुनाव मार्च में होने की संभावना है। पंचायत समिति चुनाव अगले सप्ताह होने की उम्मीद है क्योंकि निर्देश में देरी हो रही है। राजनीतिक चालबाजी प्रक्रिया में देरी कर रही है।