शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषदेचा दिल्लीत सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 11:06 IST

कोल्हापूर : ‘स्वच्छ सुंदर शौचालय’ स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा परिषदेला देशातील दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक सोमवारी प्रदान करण्यात आले. नवी दिल्ली येथील ...

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा परिषदेचा दिल्लीत सन्मान‘स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धे’तील देशातील दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्रदान

कोल्हापूर : ‘स्वच्छ सुंदर शौचालय’ स्पर्धेत कोल्हापूरजिल्हा परिषदेला देशातील दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक सोमवारी प्रदान करण्यात आले. नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित स्वच्छता महोत्सवामध्ये अध्यक्षा शौमिका महाडिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी हे पारितोषिक स्वीकारले.स्वच्छता व पेयजल विभागाचे केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, सचिव परमेश्वर आयर, अतिरिक्त सचिव अरुण बरोका यांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. केंद्र शासनाच्या पेयजल स्वच्छता मंत्रालयाकडून १ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा परिषदेने महाराष्ट्रात पहिला, तर भारत देशात दुसरा क्रमांक पटकाविला.वैयक्तिक तसेच शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायत क्षेत्रांतील सार्वजनिक शौचालय रंगविण्याच्या या व्यापक मोहिमेमध्ये सर्व स्तरावरील लोकसहभाग व शासकीय यंत्रणांचे योगदान मिळावे यासाठी दिनांक २८ जानेवारी २०१९ हा दिवस ‘एक दिवस शौचालयासाठी’ म्हणून घोषित करण्यात आला होता. यामध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. या स्पर्धेअंतर्गत जिल्ह्यात एकूण ४,३१,५८४ इतकी वैयक्तिक शौचालये रंगविण्यात आली. तसेच ८,४१९ इतकी सार्वजनिक शौचालय, शाळा व अंगणवाडी शौचालये रंगविण्यात आली.या कार्यक्रमाला पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विजय पाटील, सावर्डेच्या सरपंच सुवर्णा कारंडे, पेंढाखळेच्या सरपंच सुनीता पाटील, स्वच्छाग्रही सिद्दाप्पा करगार (गडहिंग्लज), रोहित भंडारी (राधानगरी) हे उपस्थित होते.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर