Kolhapur ZP Election Result 2026: कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल समोर येण्यास सुरुवात झाली असून आमदार विनय कोरे यांना बालेकिल्ल्यात धक्का बसल्याचे दिसत आहे. भादोले, घुणकी, सातवे जिल्हा परिषदेचे निकाल समोर आले आहेत या तिनही मतदार संघात आमदार विनय कोरे यांच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे.
घुणकी जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसच्या शुभांगी महेश कुंभार या विजयी झाल्या आहेत. तर पंचायत समिती नवे पारगाव मध्ये काँग्रेसचे भारत विरधवल पाटील यांचा विजयी झाला आहे. तर घुणकी पंचायत समिती जनसुराज्यच्या कल्याणी राजवर्धन मोहिते या विजयी झाल्या आहेत.
सातवे जिल्हा परिषद मतदार संघ आणि पंचायत समितीत जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. जिल्हा परिषदेत डॉ. जयंत पाटील यांचा विजय झाला आहे. सातवे पंचायत मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माणिक पाटील विजयी झाले आहेत. माले पंचायत समिती मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या भारती पाटील विजयी झाल्या आहेत.
तर भादोले जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या सोनाली सावंत यांचा विजय झाला आहे. आमदार सतेज पाटील यांनी शेवटच्या क्षणी सोनाली सावंत यांना उमेदवारी दिली होती.
कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसची विजयी घोडदौड
काँग्रेसने आतापर्यंत १२ जागावर विजय मिळवला
दुसऱ्या क्रमांकवर राष्ट्रवादी काँग्रेसने १० जागा मिळवल्या
भाजप ७, शिवसेना७, जनसुराज्यने४ जागा मिळवल्या
ठाकरे २आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एक
जिल्हा- कोल्हापूर (पंचायत समिती)
शाहूवाडी 8
भाजप - 2काँग्रेस -2राष्ट्रवादी -शिवसेना -शिवसेना ठाकरे - 1जनसुराज्य -1
पन्हाळा 12
भाजप - काँग्रेस - 1राष्ट्रवादी - 2शिवसेनाजनसुराज्य - 1
हातकंणगले 22
भाजप - 3काँग्रेस -3राष्ट्रवादी -2शिवसेना
शिरोळ 14
भाजप - 3काँग्रेस - 2राष्ट्रवादी शिवसेनास्वाभिमानी - 3
करवीर 24
भाजप - 4काँग्रेस -5राष्ट्रवादी -3शिवसेना-2
गगनबावडा - 4
भाजप - काँग्रेस -4राष्ट्रवादीशिवसेना
राधानगरी 10
भाजप - काँग्रेस -1राष्ट्रवादी- 2शिवसेना -4
कागल - 12
भाजप - 2काँग्रेस -राष्ट्रवादी - 6शिवसेना- 1
भुदरगड - 8
भाजप - काँग्रेस -2राष्ट्रवादीशिवसेना- 6
आजरा 4
भाजप - 2काँग्रेस -राष्ट्रवाद 1शिवसेना- 2
गडहिंग्लज - 10
भाजप - 2काँग्रेस -राष्ट्रवादी - 6शिवसेना
चंदगड -8
भाजप - 3काँग्रेस -राष्ट्रवादी - 3शिवसेनाजनसुराज्य - 1
Web Summary : MLA Vinay Kore faces setback as Congress triumphs in Bhadole, Ghunki. Nationalist wins in Satve. Congress secures 12 seats, Nationalist 10, BJP and Shiv Sena 7 each in Kolhapur.
Web Summary : विधायक विनय कोरे को झटका, भादोले, घुणकी में कांग्रेस विजयी। सातवे में राष्ट्रवादी की जीत। कोल्हापुर में कांग्रेस को 12, राष्ट्रवादी को 10, भाजपा और शिवसेना को 7-7 सीटें।