शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील कोरोना कथित घोटाळ्याची याचिका निकाली, उच्च न्यायालयाचा निर्णय

By समीर देशपांडे | Updated: December 12, 2024 13:42 IST

पोलिस तपासात आढळले नाही तथ्य

समीर देशपांडेकोल्हापूर : कोरोना काळात जिल्हा परिषदेत झालेल्या कोरोना खरेदीतील कथित घोटाळ्याची याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. ४ डिसेंबरला हा निर्णय देण्यात आला. गेली दीड वर्षे याबाबत उच्च न्यायालयात सुनावण्या सुरू होत्या. याचिकादारांच्या तक्रारीच्या गुणवत्तेचा आम्ही यामध्ये विचार केलेला नाही. परंतु याबाबतचा पोलिस अहवाल मिळाल्यानंतर पुन्हा योग्य ठिकाणी दाद मागण्याचा याचिकाकर्त्यांना अधिकार आहे, असेही न्यायाधीशांनी नमूद केले आहे. न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण आणि रेवती मोहिते डेरे यांनी हा निर्णय दिला.येथील विश्वजित सचिन जाधव आणि इतरांनी याप्रकरणी गेल्यावर्षी याचिका दाखल केली होती. त्याची गेल्या चार महिन्यांपासून सुनावणी सुरू आहे. २३ ऑक्टोबर रोजीच्या ऑनलाइन सुनावणी वेळी उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा पोलिसप्रमुख महेंद्र पंडित यांच्याकडून माहिती घेतली होती आणि महिनाभरात तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार, पंडित यांनी शाहुपुरी पाेलिस ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक विशाल मुळे यांच्याकडे तपासाची जबाबदारी साेपविली होती. त्यानंतर, मुळे यांनी शाहुपुरी पोलिस ठाणे आणि जिल्हा परिषदेच्या जुन्या कागलकर वाड्यातून चौकशीला सुरुवात केली आहे. २०२० ते २०२२ या कोरोना काळातील खरेदी, खरेदीची गरज, त्याची निविदा प्रक्रिया, तत्कालीन दर, वस्तूंच्या पुरवठ्यातील नेमकेपणा, बिलाची रक्कम अदा करण्याची प्रक्रिया या सगळ्यांची छाननी करण्यात आली आणि यानंतर बंद लिफाफ्यामध्ये या तपासाचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला.मात्र या याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा अहवाल जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांनी दिला असल्याचे निकालपत्रात नमूद करण्यात आले आहे. ॲड. जयंत बारदेसकर यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने तर ॲड. पी. पी. शिंदे यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.

अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सुटकेचा नि:श्वासकोरोना संपला परंतु नंतर त्या काळातील खरेदीची कवित्व अजूनही सुरू आहे. त्या काळच्या खरेदी प्रक्रियेतील एकही अधिकारी सध्या जिल्हा परिषदेत कार्यरत नाही. परंतु नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांच्या खरेदी फाईल्स काढणे, तपासणे आणि त्याचे अहवाल करण्याचे काम करावे लागले. गेली तीन वर्षे अधिकारी, कर्मचारी या छाननी आणि अहवालातच अडकले असून उच्च न्यायालयाच्या निर्णयाने या सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्याCourtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय