शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नोटांनी भरला शिपायाचा खिसा, आता अहवाल द्यायचा कसा?; कोल्हापूर जिल्हा परिषदेत घडलेल्या प्रकाराची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:23 IST

कोल्हापूर : दिवस ३१ मार्चचा. वेळ रात्री साडे आठची. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. आपल्या दालनातून बाहेर पडले. पहिल्या ...

कोल्हापूर : दिवस ३१ मार्चचा. वेळ रात्री साडे आठची. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. आपल्या दालनातून बाहेर पडले. पहिल्या मजल्यावरील प्रत्येक विभागाची पाहणी करत ते गर्दी असलेल्या बांधकाम विभागाकडे निघाले. ते आलेत म्हटल्यावर त्यांच्यासाठी दार उघडणाऱ्या शिपायाचे खिसे फुगलेले त्यांनी पाहिले. तपासणीअंती सगळ्या खिशात पैसेच भरले होते. या प्रकाराचा अहवाल देण्याचा त्यांनी आदेश दिला आणि या प्रकाराची चर्चा सुरू झाली. परंतु, आता अहवाल नेमका काय द्यायचा, या विवंचनेत अधिकारी पडले आहेत.कार्तिकेयन हे गतवर्षी मार्चमध्येच जिल्हा परिषदेत हजर झाले होते. ३१ मार्चची येथील गर्दी पाहून त्यांनी ठेकेदारांना इकडे यायला लागू नये, अशी प्रणाली तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, याबाबत फारसे काही झाले नाही. यंदाही ३१ मार्च रात्री साडेआठनंतर ते सर्व विभाग फिरत बांधकाम विभागात निघाले. त्यांच्यासाठी दार उघडणाऱ्या शिपायाच्या फुगलेल्या खिशांकडे त्यांचे लक्ष गेले. खिशात काय आहे, असे त्यांनी विचारल्यानंतर त्याची बोबडी वळली. तो बाजुला होत असतानाच कार्तिकेयन यांनी सोबत असलेल्या शिपायाला त्याचे खिसे तपासायला सांगितले. तेव्हा त्याच्या खिशातून ५०० रुपयांच्या नोटा निघाल्या.हे नेमके काय आहे, अशी विचारणा करत कार्तिकेयन यांनी विभागप्रमुखांना सर्व काम झाल्यानंतर या प्रकाराची चौकशी करून अहवाल देण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर सीईओ मुंबईला बैठकीसाठी गेल्याने दोन दिवस नव्हते. त्यामुळे आता या घटनेचा नेमका अहवाल काय द्यायचा, यावर खल सुरू झाला आहे.

लाभदायी मार्चअखेरबांधकाम, वित्त, ग्रामपंचायत, ग्रामीण पाणीपुरवठा, मुख्यमंत्री सडक योजना, आरोग्य विभाग या ठिकाणी मार्चअखेरीस मोठी लगबग असते. ऐनवेळचा निधी पदरात पाडून घेण्यापासून बिले काढण्यापर्यंतची लगबग सुरू असल्याने शिपायांची यात महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे अनेक विभागांच्या शिपाई, लिपिकांसह अधिकाऱ्यांना मार्चअखेर लाभदायी असल्याचीही चर्चा यानिमित्ताने रंगली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद