शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पंचगंगा पुलावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 19:59 IST

शिरोली येथील पंचगंगा नदी पुलावरून उडी मारून तरुणाने आत्महत्या केली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढला.

ठळक मुद्दे पंचगंगा पुलावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

कोल्हापूर : शिरोली येथील पंचगंगा नदी पुलावरून उडी मारून तरुणाने आत्महत्या केली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढला.

बाबूराव नवनाथ भोसले (वय ३५, रा. सावंत गल्ली, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. तो व्यसनाच्या आहारी गेला होता. दारू पिऊन त्याने जीवनयात्रा संपविल्याची चर्चा गावात होती. बुधवारी दुपारी ही घटना घडली. यावेळी पुलावर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.अधिक माहिती अशी, बाबूराव भोसले हा कामधंदा करत नव्हता. तो दारूच्या आहारी गेला होता. नेहमी दारू पिवून असे. बुधवारी दुपारी दारूच्या नशेत त्याने शिरोली पंचगंगा नदी पुलावरून पाण्यात उडी मारली.

या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी पुलावर गर्दी केली. भोसले याची पाण्यात हात-पाय हलवत जीव वाचविण्याची धडपड सुरू असताना पुलावरून लोक पाहत होते. काहींनी त्याचे मोबाईलमध्ये व्हीडीओ चित्रीकरणही केले. मात्र, त्याला वाचविण्यासाठी कोणी पुढे सरसावले नाही किंवा प्रयत्न केले नाही.

लोकांच्या डोळ्यांसमोर तो पाण्यात बुडाला. या प्रकाराची वर्दी मिळताच महापालिका अग्निशामक दलाचे जवान नवनाथ साबळे, रवींद्र ठोंबरे, माणिक कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेत गळाच्या सहाय्याने शोध घेत भोसले याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.

त्यानंतर तो सीपीआरला शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा