शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
3
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
4
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
5
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
6
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
7
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
8
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
9
'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
10
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
11
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
12
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
13
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!
14
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
15
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
16
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
17
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
18
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
19
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
20
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार

कोल्हापूर : युवतीने लगावली तरुणाच्या कानशिलात, मोपेडला धक्का देऊन पळून जाण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 19:15 IST

भरधाव वेगात मोपेडला धक्का मारून गेलेल्या तरुणाचा एक किलोमीटर पाठलाग करून तरुणीने भररस्त्यावर तरुणाच्या कानशिलात लगावल्या. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास मिरजकर तिकटी येथे घडलेला हा प्रकार येथील एका दुकानाच्या समोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला आहे. या धक्कादायक प्रकाराने शहरातील युवतींची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

ठळक मुद्देयुवतीने लगावली तरुणाच्या कानशिलातमोपेडला धक्का देऊन पळून जाण्याचा प्रयत्न मिरजकर तिकटी परिसरातील घटना

कोल्हापूर : भरधाव वेगात मोपेडला धक्का मारून गेलेल्या तरुणाचा एक किलोमीटर पाठलाग करून तरुणीने भररस्त्यावर तरुणाच्या कानशिलात लगावल्या. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास मिरजकर तिकटी येथे घडलेला हा प्रकार येथील एका दुकानाच्या समोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला आहे. या धक्कादायक प्रकाराने शहरातील युवतींची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.शहरात युवती-महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांच्या निर्भया पथकांना शहरात फेरफटका मारून अशा उपद्व्यापी तरूणांचा चांगलाच बंदोबस्त केला आहे. युवतींनी स्वत:चे स्वरक्षण करावे, यासाठी पोलीस दलाच्यावतीने कराटेचे प्रशिक्षणही दिले आहे. शाळा-महाविद्यालयांत कार्यशाळा घेतल्या आहेत.

निर्भया पथकाकडून कारवाईसत्र सुरू असतानाही काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांवर फरक पडलेला दिसत नाही. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास संभाजीनगरहून २२ वर्षांची युवती मोपेडवरून शहरात येत होती. पाण्याचा खजिना येथे तिच्या मोपेडला पाठीमागून दुचाकीवरून भरधाव आलेल्या तरुणाने धक्का देत पुढे निघून गेला. यावेळी युवतीने ‘दाद्या थांब,’ अशी हाक दिली. मात्र, तो सुसाट निघून गेला.

युवतीनेही हिम्मत सोडली नाही. त्याचा सुमारे एक किलोमीटर थरारक पाठलाग करून मिरजकर तिकटी परिसरात त्याच्या आडवी दुचाकी लावून त्याला थांबविले. खाली उतरून तीन-चार कानशिलात लगावल्या. भर रस्त्यावर युवती तरुणाला मारहाण करत असल्याचे पाहून नागरिकांनी गर्दी केली.

या घटनेची माहिती समजताच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे दोन कॉन्स्टेबल घटनास्थळी आले. त्यांनी तरुणाला दुचाकीसह ताब्यात घेतले. युवतीने या प्रकरणी तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल झाला नाही. हा प्रकार येथील एका दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाला आहे. तो सर्वत्र व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा