शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘भाजप’च्या मुंबई मेळाव्यासाठी कोल्हापुरातून कार्यकर्ते रवाना, विशेष रेल्वेची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 19:11 IST

भाजपच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई येथे होणाऱ्या महामेळाव्यासाठी कोल्हापुरातून सुमारे दहा हजार कार्यकर्ते गुरुवारी रवाना झाले. त्यासाठी पक्षातर्फे कोल्हापूरमधून दोन आणि मिरज येथून एका विशेष रेल्वेची सुविधा केली होती.

ठळक मुद्देकोल्हापूर : ‘भाजप’च्या मुंबई मेळाव्यासाठी कोल्हापुरातून कार्यकर्ते रवानाविशेष रेल्वेची सुविधा; महिला, युवकांचा सहभाग

कोल्हापूर : भाजपच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई येथे होणाऱ्या महामेळाव्यासाठी कोल्हापुरातून सुमारे दहा हजार कार्यकर्ते गुरुवारी रवाना झाले. त्यासाठी पक्षातर्फे कोल्हापूरमधून दोन आणि मिरज येथून एका विशेष रेल्वेची सुविधा केली होती.या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील बीकेसी मैदानावर महामेळावा आज, शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. यासाठी गुरुवारी दुपारी सव्वा दोन वाजता आणि साडेचार वाजता कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्स येथून दोन विशेष रेल्वेतून कार्यकर्ते रवाना झाले. रेल्वे स्थानकावर दुपारी बारा वाजल्यापासून कार्यकर्त्यांची गर्दी होऊ लागली. तासभरात रेल्वे आणि स्थानकाचा परिसर त्यांच्या गर्दीने फुुलला.

पक्षाच्या विजयाच्या घोषणांनी स्थानक परिसर दुमदुमून गेला. कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून आला. कार्यकर्त्यांना रेल्वेतून रवाना करण्यासाठी येथे आमदार अमल महाडिक, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, जिल्हा संघटन मंत्री बाबा देसाई, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, नगरसेवक किरण नकाते, हेमंत आराध्ये, वैशाली पसारे, प्रभा इनामदार, सुलभा मुजुमदार, किशोरी स्वामी, सुरेश जरग, आदी उपस्थित होते.

दरम्यान, याबाबत देवस्थान समितीचे अध्यक्ष जाधव यांनी सांगितले की, मुंबईतील या महामेळाव्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मार्गदर्शन करणार आहेत. कोल्हापुरातून या मेळाव्यासाठी सुमारे दहा हजार कार्यकर्ते रवाना झाले आहेत. या महिला कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय आहे. रेल्वे रवाना झालेल्या कार्यकर्त्यांना अल्पोपहार, पाण्याची सुविधा पक्षाने केली आहे. विशेष रेल्वेचे भाडेदेखील भरले आहे.

रेल्वे विभागाकडून ‘डेमू’ची चाचणीभाजपच्या महामेळाव्यासाठी कोल्हापूर आणि मिरज येथून रवाना होणाऱ्या रेल्वे यांना अतिरिक्त डब्यांची गरज होती. त्यासाठी मध्य रेल्वे विभागाने सोलापूरहून दोन डीजेल मल्टिपल युनिट (डेमू) कोल्हापूर आणि मिरज येथे तात्पुरत्या स्वरूपात आणल्या. याद्वारे कोल्हापूर-मिरज शटल सर्व्हिस सुरू करण्याच्या अनुषंगाने ‘डेमू’ची चाचणीदेखील घेण्यात आली, असे स्टेशन प्रबंधक विजय कुमार यांनी सांगितले.

ते म्हणाले, कोल्हापूरसाठी तीन ‘डेमू’ मंजूर झाल्या आहेत. मात्र, त्यांच्या देखभाल-दुुरूस्ती आणि चालकांला प्रशिक्षण देण्याची सुविधा कोल्हापुरात उपलब्ध नाही. या सुविधेसाठी ६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

कोल्हापूर-मिरज या मार्गावर शटल सर्व्हिसच्या माध्यमातून ‘डेमू’ धावण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. दरम्यान, याबाबत पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी सांगितले की, ‘डेमू’तील दोन रेल्वे या बारा आणि एक पंधरा बोगींची आहे. या रेल्वेमुळे कोल्हापूरकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची असलेली कोल्हापूर-मिरज मार्गावरील शटल सर्व्हिसची मागणी पूर्ण होणार आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपा