शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : आरक्षणासाठी धनगर समाजाचा महामोर्चाद्वारे सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 19:28 IST

धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या (एसटी)आरक्षणाची अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांसाठी समस्त धनगर समाज आरक्षण कृती समितीतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देआरक्षणासाठी धनगर समाजाचा महामोर्चाद्वारे सरकारला इशारा ...अन्यथा हातात कुऱ्हाड अन शेळ्या मेंढ्या घेऊन रस्त्यावर उतरु: प्रकाश शेंडगे

कोल्हापूर : धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या (एसटी)आरक्षणाची अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांसाठी समस्त धनगर समाज आरक्षण कृती समितीतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. तर ८ सप्टेंबरपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास हातात कुऱ्हाड आणि शेळ्या मेंढ्या घेऊन रस्त्यावर उतरु असे, रणशिंग माजी आमदार रमेश शेंडगे यांनी यावेळी फुंकले.जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून धनगर बांधवांनी सकाळपासूनच दसरा चौकात जमायला सुरुवात केली. दुपारी बाराच्या सुमारास महामोर्चाला सुरुवात झाली. कपाळी भंडारा व हातात पिवळे झेंडे घेतलेल्या धनगर बांधवांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...’, ‘राजर्षी शाहू महाराज की जय...’, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर की जय...’‘यळकोट...यळकोट...जय मल्हार...’, असा जयघोष करत मोर्चामार्ग दणाणून सोडला.

व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार रोडमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. सुरुवातीला धनगर समाजातील रणरागिणी व मावळ्यांना बोलण्याची संधी देण्यात आली. यामध्ये तनिष्का म्हैसाळे (अर्जुनवाडा), माऊली गावडे (शिरोली पुलाची ), विश्वनाथ पुजारी (नेर्ली), श्रद्धा पुजारी (कुंभोज), प्रज्ञा पुजारी (अब्दुलल्लाट), श्रुती बरगाले (हेरवाड), सायली पुजारी यांनी आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत माघार नाही असा इशारा सरकाला दिला.

त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी यळकोट यळकोट जय मल्हार च्या घोषणांनी दाद दिली. यानंतर मागण्यांचे निवेदन या रणरागिणींच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना सादर करण्यात आले. यावेळी माजी आमदर प्रकाश शेंडगे म्हणाले, कालेलकर आयोगाने धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश केला. परंतु नंतर ‘ध’ चा ‘मा’ झाल्याने धनगर समाज आरक्षणापासून वंचित राहीला. मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी बारामती येथील सभेत आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. परंतु चार वर्षे होत आली तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर २०१९ च्या निवडणुकीत भंडारा फुकून सरकार खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.आंदोलनात विलासराव वाघमोडे, बाबूराव हजारे, अशोक कोळेकर, कल्लाप्पा गावडे, आप्पासो हजारे, तानाजी हराळे, बाबासो सावगावे, राजसिंह शेळके, संजय अनुसे, अभिजीत बत्ते, राजेंद्र कोळेकर, देवाप्पा चोपडे, जगन्नाथ माने, डॉ. संदीप हजारे, बयाजी शेळके, बाळासो मोटे, प्रा. लक्ष्मण करपे, उन्मेश वाघमोडे, संदीप कारंडे आदींसह धनगर समाज बांधव सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :reservationआरक्षणkolhapurकोल्हापूर