शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचा विशाल पिंजानी ठरला ‘मिस्टर गे इंडिया’; ‘मिस्टर वर्ल्ड गे’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 11:16 IST

कोल्हापूर : मिस्टर गे इंडिया आणि मिस्ट एलजीबीटी यांच्यातर्फे आयोजित केलेल्या ‘मिस्टर गे इंडिया’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोल्हापूरच्या ...

कोल्हापूर : मिस्टर गे इंडिया आणि मिस्ट एलजीबीटी यांच्यातर्फे आयोजित केलेल्या ‘मिस्टर गे इंडिया’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोल्हापूरच्या विशाल पिंजानीने बाजी मारली. विशाल आता साउथ आफ्रिकेतील केपटाउन येथे होणाऱ्या ‘मिस्टर वर्ल्ड गे’ या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.पुण्यात ५ ऑक्टोबरला झालेल्या रंगारंग सोहळ्यात कोल्हापूर आणि परिसरात एलजीबीटीक्यूआयएप्लस समुदायासाठी ‘अभिमान’ या स्वयंसहाय्यता गटाद्वारे कार्य करणाऱ्या विशालला सर्व परीक्षकांनी पहिली पसंती दिली. या अंतिम सोहळ्यात समलिंगी पुरुषांचे सामाजिक-सांस्कृतिक संघर्षाला सामोरे जात आत्मविश्वासपूर्वक घडवलेल्या व्यक्तिमत्त्वाचे मोहक रूप, सहानुभाव, सर्वसमावेशकता याचे अनोखे दर्शन घडले. समलिंगी पुरुषांसाठीच्या या स्पर्धेत शारीरिक तंदुरुस्ती, रुबाबदार व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता, हजरजबाबीपणा सोबतच एलजीबीटीक्यूआयएप्लस समुदायासाठी केलेले सामाजिक कार्य हे निकष होते. भारताच्या विविध प्रांतातून सहभागी झालेल्या स्पर्धकांतून निवडक स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले. विशाल एकेक फेरी पार करत अंतिम फेरीत पोहोचला. परीक्षकांचे गुण आणि वेबसाइटद्वारे लोकांनी दिलेली मते विचारात घेऊन अंतिम निकाल दिला गेला. समलिंगी असल्याचं जाहीरपणे सांगणारे राजपिपळा संस्थानाचे राजपुत्र मानवेंद्र सिंह गोहिल यांच्या हस्ते विशालला मिस्टर गे इंडियाचा किताब देण्यात आला.विशालमध्ये लहानपणापासून समलैगिकतेची भावना होत्या. अकरावी आणि बारावीला असताना मित्रांनी हिंसा केल्यामुळे शिक्षण सोडले. समलैगिक असलेल्या काही मित्रांनी हा त्रास सहन न झाल्याने आत्महत्या केल्या. तेव्हा या चुकीच्या समजाविषयी माहिती घेतली. जागतिक आरोग्य संघटनेने हा आजार नसून ती एक नैसर्गिक भावना असल्याचे जाहीर केल्यानंतर घरच्यांनी स्वीकारले. आज राजारामपुरी येथील ग्रंथ वर्ल्ड त्याच्या मालकीचे आहे. अभिमान या संस्थेच्या माध्यमातून तो २०१७ पासून कोल्हापूर जिल्ह्यात काम करतो आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTransgenderट्रान्सजेंडर