शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : आवक घसरल्याने भाजीपाला वधारला, फळांच्या दरातही वाढ; पण ‘हापूस’ आवाक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 11:34 IST

खरीप पेरणीसाठी जमिनी मोकळ्या करण्यास सुरुवात झाल्याने भाजीपाल्याची आवक हळूहळू कमी होऊ लागली असून, परिणामी गत आठवड्याच्या तुलनेत दर वधारलेले दिसतात. फळबाजारामध्ये काहीशी तेजी दिसत आहे; पण हापूस आंब्यांच्या दरात घसरण झाली असून, किरकोळ बाजारात १०० रुपये प्रतिडझनापर्यंत आंबा आला आहे.

ठळक मुद्दे आवक घसरल्याने भाजीपाला वधारलाफळांच्या दरातही वाढ; पण ‘हापूस’ आवाक्यात कडधान्य खरेदीसाठी लगबग

कोल्हापूर : खरीप पेरणीसाठी जमिनी मोकळ्या करण्यास सुरुवात झाल्याने भाजीपाल्याची आवक हळूहळू कमी होऊ लागली असून, परिणामी गत आठवड्याच्या तुलनेत दर वधारलेले दिसतात. फळबाजारामध्ये काहीशी तेजी दिसत आहे; पण हापूस आंब्यांच्या दरात घसरण झाली असून, किरकोळ बाजारात १०० रुपये प्रतिडझनापर्यंत आंबा आला आहे. पावसाळ्याची बेगमी करण्यासाठी कडधान्य बाजारामधील खरेदीची लगबग अजूनही कायम आहे.कोल्हापूर बाजारात सांगली, बेळगावसह स्थानिक भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात असते. शेतकऱ्यांकडून भाजीपाला काढून खरीप पेरणीसाठी जमिनी मोकळ्या केल्या जात आहेत. स्थानिक भाजीपाला कमी झाल्याने दरात वाढ होत असून, किरकोळ बाजारात साधारणत: किलोमागे दरात पाच रुपयांची वाढ झाल्याची दिसते.

वांगी, ढबू, गवार, कारली, भेंडी, दोडका या फळभाज्यांच्या दरात किलोमागे पाच ते सात रुपयांची वाढ झाली आहे. फळभाज्यांमध्ये बिनीसचा दर सर्वांत चढा असून घाऊक बाजारात तो ७५ रुपये किलो आहे. कोथिंबिरीचा हंगाम सुरू झाल्याने आवक थोडी वाढली आहे.

बाजार समितीत रोज २५ हजारांहून अधिक पेंढ्यांची आवक होत आहे. त्यामुळे गत आठवड्यापेक्षा पेंढीमागे चार ते पाच रुपयांची घसरण झालेली दिसते. मेथी, पोकळा, पालक या पालेभाज्यांची आवक एकदम कमी झाल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात पेंढीचा दर १० ते १५ रुपये आहे.फळबाजारात मोसंबी, संत्री, चिक्कू, सफरचंद या फळांची आवक मर्यादित असल्याने दर अजूनही तेजीत आहेत; पण हापूस आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोकण, चेन्नई (मद्रास), कर्नाटकातून अजूनही आवक चांगली असल्याने ‘हापूस’ सामान्यांच्या आवाक्यात आला आहे.

किरकोळ बाजारात किमान १००, तर कमाल २०० रुपये दर राहिला आहे. लालबागच्या आंब्याचे दरही खाली आले असून, तो ३० रुपये डझन आहे. तोतापुरीची आवक स्थिर असली तरी लहान तोतापुरी आंबा पंधरा रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.पावसाळ्याची बेगमी करण्यासाठी कडधान्य खरेदीची लगबग अजूनही बाजारात दिसत आहे. तूरडाळ, मूगडाळीचे दर ६५ रुपये, तर हरभराडाळ ५० रुपये किलोपर्यंत आहे. साखरेचे दर काहीसे स्थिर झाले असून किरकोळ बाजारात ३२ रुपये दर आहे. सरकी तेल, शेंगदाणा, रवा, मैद्याच्या दरांत फारसा चढउतार दिसत नाही.

कांदा-बटाटा स्थिरकांदा-बटाट्याची आवक स्थिर असल्याने दरात चढउतार झालेला नाही. घाऊक बाजारात कांदा सरासरी साडेसहा रुपये, तर बटाट्याचा प्रतिकिलो १७ रुपये दर आहे.

फणसाची आवक सुरूआंबे, करवंदे, चिकन्या या रानमेव्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. आता फणसाची आवक सुरू झाली असून, किरकोळ बाजारात ‘काफा’ फणसाचा ७० ते ८० रुपये दर आहे.

 

 

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजारkolhapurकोल्हापूर