पेठ वडगाव : जिल्ह्यात सर्वाधिक चुरशीने झालेल्या वडगाव नगरपालिका निवडणुकीत यादव आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विद्याताई पोळ यांनी २२६५ मतांनी विजय मिळवला. त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्ष व ताराराणी आघाडीच्या प्रविता सालपे यांचा पराभव केला. वडगावमध्ये विद्याताई पोळ यांच्या लाटेत सत्ताधारी वाहून गेले, यादव आघाडीने १५ जागा मिळवल्या तर जनसुराज्य पक्ष ताराराणी आघाडीला ५ जागांवर समाधान मानावे लागले.वडगाव पालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदी विद्याताई गुलाबराव पोळ या विजयी झाले.यादव पॅनेल ने १५ तर जनसुराज्य व ताराराणीला पाच जागा वर समाधान मानावे लागले. वडगावात सत्तांतर करण्यास यश आले.वडगाव पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुक नुकतीच झाली होती.त्यांची मतमोजणी येथील मराठा समाज सांस्कृतिक मंदिरात करण्यात आली.यामध्ये नगराध्यक्ष पदासह 20 जागांसाठी निवडणूक झाली.दहा टेबलावर करण्यात आली. यामध्ये अतिशय सथं गतीने मतमोजणी सुरू होती.याबाबत माध्यम प्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.यादव पॅनेल चे उमेदवार असेसुरेखा महादेव अनुसे, धनश्री इंद्रजीत पोळ, मिलिंद लमुवेल सनदी, निवास वसंत धनवडे, वर्षा सतीश पोवार, विशाल विजय वडगावे, रूपाली अभिजीत माने, कल्पना सर्जेराव भोसले, अभिजीत बाळासो गायकवाड, प्रविण आप्पासाहेब पाटील, सुषमा बाबासाहेब पाटील, नीला जयसिंग जाधव, जवाहर बाजीराव सलगर, सुमन अशोक कोळी, गुरूप्रसाद दिलिपसिंह यादव, जनसुराज्य व ताराराणीचे पाच उमेदवार विजयी झाले. यात संतोष चव्हाण, अंजली थोरात, अजय थोरात, मोहनलाल माळी, राजश्री भोपळे यांचा समावेश आहे.
Web Summary : In Vadgaon, Vidya Tai Pol of the Yadav Alliance won the Nagar Parishad election with 2263 votes, defeating the Janasurajya and Tararani alliance. The Yadav Alliance secured 15 seats, leading to a change in power. Janasurajya and Tararani got only 5 seats.
Web Summary : वडगाँव में, यादव गठबंधन की विद्या ताई पोल ने 2263 वोटों से नगर परिषद चुनाव जीता, जिससे जनसुराज्य और तारारानी गठबंधन हार गए। यादव गठबंधन ने 15 सीटें हासिल कीं, जिससे सत्ता में बदलाव आया। जनसुराज्य और तारारानी को केवल 5 सीटें मिलीं।