कोल्हापूर अर्बन बॅँकेत सत्ताधारी पॅनेलची बाजी

By Admin | Updated: April 7, 2015 01:21 IST2015-04-07T01:05:25+5:302015-04-07T01:21:42+5:30

रवींद्र गुरव पराभूत : शिरीष कणेरकर यांना सर्वाधिक मते

In Kolhapur Urban Bank, the ruling panel picks up | कोल्हापूर अर्बन बॅँकेत सत्ताधारी पॅनेलची बाजी

कोल्हापूर अर्बन बॅँकेत सत्ताधारी पॅनेलची बाजी

कोल्हापूर : कोल्हापूर अर्बन बॅँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलने एकतर्फी विजय मिळवत बाजी मारली. विजयी उमेदवारांमध्ये सत्ताधारी पॅनेलचे प्रमुख शिरीष कणेरकर यांना सर्वाधिक ४,५५३ मते मिळाली. सोमवारी सकाळी विजयाची घोषणा झाल्यावर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष केला. सर्वसाधारण व इतर मागासवर्ग या दोन्ही गटांतून अपक्ष उमेदवार असलेले रवींद्र गुरव पराभूत झाले.
नागाळा पार्क येथील महावीर कॉलेजशेजारील आचार्य विद्यानंद सांस्कृतिक भवन येथे मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेश कदम व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कोळी यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. ३० टेबलांवर ही मोजणी झाली. एकूण २६ हजार ९१ पैकी ५ हजार ४२ इतके मतदान झाले होते. मतदान कमी असल्याने मतमोजणी प्रक्रिया दोन तासांतच आटोपली. यापैकी ३५० मतपत्रिका अवैध झाल्या. उर्वरित ४,८८५ मतदान मोजण्यात आले. सकाळी दहाच्या सुमारास डॉ. महेश कदम यांनी निकाल घोषित केला. यामध्ये सत्ताधारी पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर एकच जल्लोष केला. गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली. विजयी उमेदवारांसह समर्थकांनी गुलाल लावून विजयोत्सव साजरा केला. सत्ताधारी पॅनेलने एकतर्फी विजय मिळवत दोन्ही गटांतून उभे राहिलेले अपक्ष उमेदवार रवींद्र गुरव प्रभाव पाडू शकले नाहीत.


विजयी, पराभूत उमेदवारांची नावे व त्यांना पडलेली मते
सर्वसाधारण गट : विजयी उमेदवार : सत्ताधारी पॅनेलचे प्रमुख शिरीष कणेरकर (४,५५३), राजन भोसले (४,५४१), बाबासाहेब मांगुरे (४,५३८), शिवाजीराव कदम (४,५१७), जयसिंग माने (४,५०१), उमेश निगडे (४,४७२), पांडुरंग पाटील (४,४३५), यशवंतराव साळोखे (४,४३५), रवींद्र धर्माधिकारी (४,४२०), मधुसूदन सावंत (४,२५२).
सर्वसाधारण गट : पराभूत उमेदवार : अपक्ष उमेदवार रवींद्र गुरव (७७६)
इतर मागासवर्गीय गट : विजयी उमेदवार : सत्ताधारी पॅनेलचे सुभाष भांबुरे (४,४५०)
इतर मागासवर्गीय गट : पराभूत उमेदवार : अपक्ष उमेदवार रवींद्र गुरव (४९१).


बिनविरोध झालेले उमेदवार
भटक्या विमुक्त जाती-जमाती प्रवर्गातून विश्वास काटकर, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून नामदेवराव कांबळे, महिला प्रवर्गातून सुमित्रा शिंदे व गीता जाधव यांची बिनविरोध निवड झाली. हे सर्व सत्ताधारी पॅनेलचे उमेदवार आहेत.

Web Title: In Kolhapur Urban Bank, the ruling panel picks up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.