शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

कोल्हापूर : तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 19:43 IST

कोल्हापूर येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी विश्वास सुतार यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये झालेल्या महानगरपालिकेतील शाळेतील मुख्याध्यापकांच्या बैठकीत या लोगोचे अनावरण करण्यात आले.

ठळक मुद्देचिल्लर पार्टीला मुख्याध्यापकांच्या शुभेच्छा यंदा महानगरपालिकेच्या शाळांचा सहभाग

कोल्हापूर : येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी विश्वास सुतार यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये झालेल्या महानगरपालिकेतील शाळेतील मुख्याध्यापकांच्या बैठकीत या लोगोचे अनावरण करण्यात आले. सलग दोन दिवस शाहू स्मारक भवनात रंगणाऱ्या या महोत्सवात सहा जागतिक चित्रपट मोफत दाखविले जाणार आहेत.विद्यार्थ्यांच्या सिनेमाच्या जाणीवा विकसित व्हाव्यात या हेतूने सहा वर्षापूर्वी सुरु झालेली चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीमार्फत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी शाहू स्मारक भवन येथे मोफत बालचित्रपट चित्रपट दाखविले जातात. जिल्ह्यात आणि जिल्हाबाहेर ही चळवळ आता उभारत आहे.शिवाजी मराठा हायस्कूल येथे झालेल्या महानगरपालिकेतील शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बैठकीत चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीचे समन्वयक मिलिंद यादव यांनी चिल्लर पार्टीची संकल्पना सांगितली. या बैठकीत सर्व महानगरपालिकेतील शाळांचे विद्यार्थी सहभागी करण्याबाबत यावेळी यादव यांनी केलेल्या आवाहनाला सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला.महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी विश्वास सुतार यांनी यावेळी चिल्लर पार्टीला देणगी दिली. त्यांच्या हस्ते पतंग उडविणाऱ्या मुलीचे छायाचित्र असलेल्या तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण याप्रसंगी करण्यात आले. यावेळी चंद्रशेखर तुदीगाल, ओंकार कांबळे, निलेश झेंंडे, रसूल पाटील, सचिन पांडव, नचिकेत सरनाईक , संजय शिंदे , सुधाकर सावंत , आदी उपस्थित होते.झोपडपट्टीतील आणि महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत चित्रपट हे माध्यम पोहोचविण्याचा यंदा चिल्लर पार्टीचा हेतू आहे. या संकल्पनेला महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पाठिंबा दिल्यामुळे यंदा केवळ महानगरपालिकेतील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यंदाचा बालचित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका