अलोट गर्दीत बालचित्रपट महोत्सव सुरू

By admin | Published: February 16, 2017 12:00 AM2017-02-16T00:00:46+5:302017-02-16T00:00:46+5:30

उदंड प्रतिसाद : चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे आयोजन

Along the crowd started the Children's Film Festival | अलोट गर्दीत बालचित्रपट महोत्सव सुरू

अलोट गर्दीत बालचित्रपट महोत्सव सुरू

Next

कोल्हापूर : जगभरातील दर्जेदार कलाकृतींची मेजवानी असलेल्या दुसऱ्या बालचित्रपट महोत्सवास बालगोपालांच्या अपूर्व उत्साह व उदंड प्रतिसादात बुधवारी प्रारंभ झाला.
येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन अभिनेता प्रियदर्शन जाधव यांच्या हस्ते उपस्थितांसोबत सेल्फी घेऊन झाले. यावेळी ‘आम्ही असू लाडके’ चित्रपटातील प्राजक्ता पाटील, गणेश जोशी, वन्या करकरे, आदी कलाकार उपस्थित होते.
यावेळी अभिनेता जाधव यांनी उपस्थित बालचमूंना आपल्या चित्रपट क्षेत्रातील प्रवासाबद्दल माहिती सांगितली. ते म्हणाले, चित्रपट हे चांगला माणूस घडविण्याचे माध्यम आहे. सध्याच्या मुलांच्या ते अधिक जवळ असल्याने यातून उद्याचे चांगले नागरिक घडतील. समाजातील वंचित घटकांसाठी बालचित्रपट महोत्सव हा चिल्लर पार्टीचा चांगला उपक्रम आहे. पुढील महोत्सवासाठी मुंबईहून पाच निर्माते आपले सिनेमे घेऊन येतील, यासाठी प्रयत्न करीन.
उद्घाटनानंतर महोत्सवात ‘द क्रुड्स’ ही ओपनिंग फिल्म दाखविण्यात आली. अश्मयुगात राहणारा मानव निसर्गासोबत स्वत:ला जमवून घेत प्रगत झाला व त्याने काही नियम तयार केले; पण क्रुड्स फॅमिलीतील एक अवखळ मुलगी या नियमांच्या चाकोरीबाहेर जाऊन जगण्याचा प्रयत्न करते. यामुळे नवीन संकटे उभी राहतात व त्यावर ती कशी मात करते, यावर ‘द क्रुड्स’मधून प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यानंतर हॉलिवूड, टेक्सास, काऊबॉय आणि क्लिंट ईस्टवूड या समीकरणाच्या अ‍ॅनिमेशन अवतारावर आधारलेला ‘रॅँगो’ हा चित्रपट दाखविण्यात आला. त्यानंतर जगण्याचे नियम जो पाळतो तो जगतो व जो नियम मोडतो त्याचा नाश होतो, अशा आशयावर आधारित मानवी हस्तक्षेपामुळे जंगली प्राण्यांवर होणारा परिणाम यामधून दाखविण्यात आला.
आज, गुरुवारी महोत्सवाचा शेवटचा दिवस असून, या बालचित्रपट महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संयोजक मिलिंद यादव यांनी केले आहे. (प्रतिनिधी)


४आज, गुरुवारी दुपारी दोन वाजता या बालचित्रपट महोत्सवाचा समारोप होत असून, त्यासाठी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील बालकलाकार प्रणव सूर्यवंशी, आर्यन पाटल, सुशांत कुरुंदवाडे, सिद्धार्थ कांबळे उपस्थित राहणार आहेत.
आजचे चित्रपट : गॉड मस्ट बी क्रेझी (सकाळी ९ वा), लिजंड आॅफ दि गार्डियन्स (दुपारी १२ वा), ग्रॅव्हिटी (दुपारी ३ वा.)

Web Title: Along the crowd started the Children's Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.