शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : न्यायालय उठेपर्यंत दोनशे पालकांना शिक्षा, महिन्याभरातील कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 16:30 IST

अज्ञान मुलांची हौस पुरविण्यासाठी त्यांच्या हाती दिलेली मोटारसायकल पालकांना चांगलीच महागात पडली आहे. गेल्या महिन्याभरात सुमारे दोनशे पालकांना सत्र न्यायालयाने कामकाज पूर्ण होईपर्यंत उभे राहण्याची शिक्षा देऊन प्रत्येकी दीड हजार दंडाप्रमाणे तीन लाख रुपये वसूल केले. तसेच पुन्हा लहान मुलांच्या हाती दुचाकी दिल्यास शिक्षा देण्याचा इशाराही न्यायालयाने दिला आहे.

ठळक मुद्दे न्यायालय उठेपर्यंत दोनशे पालकांना शिक्षा, महिन्याभरातील कारवाई तीस पालक न्यायालयात राहणार हजरअज्ञात मुलांच्या हाती दुचाकी देणे पालकांना पडतेय महाग

कोल्हापूर : अज्ञान मुलांची हौस पुरविण्यासाठी त्यांच्या हाती दिलेली मोटारसायकल पालकांना चांगलीच महागात पडली आहे. गेल्या महिन्याभरात सुमारे दोनशे पालकांना सत्र न्यायालयाने कामकाज पूर्ण होईपर्यंत उभे राहण्याची शिक्षा देऊन प्रत्येकी दीड हजार दंडाप्रमाणे तीन लाख रुपये वसूल केले. तसेच पुन्हा लहान मुलांच्या हाती दुचाकी दिल्यास शिक्षा देण्याचा इशाराही न्यायालयाने दिला आहे.दरम्यान रविवारी दिवसभरात तीस अल्पवयीन मुलांना शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहन चालविताना पकडले. त्यांच्या पालकांना सोमवारी न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली.अल्पवयीन तरुण ‘धूम स्टाईल’ने बेशिस्तपणे वाहने चालविताना दिसतात. मोटारसायकलवर तिब्बल सीट बसून काही शाळकरी मुले, मुली भरधाव जाताना दिसत आहेत. त्यांना वाहन चालविण्याचे नियम माहीत नसतात. अविचारी बुद्धीने वाहन चालवित असताना अपघाताला सामोरे जावे लागते.

महिन्याभरात राबविलेल्या ‘ट्रॅफिक ड्राईव्ह’ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर दोनशे पालकांना आपल्या अल्पवयीन मुलाला वाहन चालविण्यास दिल्याने शिक्षा भोगावी लागली आहे. शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी १८ वर्षांखालील दोनशे मुलांना दुचाकी चालविताना पकडून त्यांच्या पालकांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली होती.

रविवारी दिवसभरात तीस अल्पवयीन मुलांना पकडून त्यांच्या दुचाकीही जप्त करून घेतल्या आहेत. त्यांच्या पालकांना आज, सोमवारी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. पोलिसांच्या या पुन्हा सुरू झालेल्या कारवाईमुळे पालकांचे धाबे दणाणले आहेत. 

 

टॅग्स :Courtन्यायालयTrafficवाहतूक कोंडीkolhapurकोल्हापूर