विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या 13 हजार नागरिकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 03:03 PM2018-05-05T15:03:56+5:302018-05-05T15:03:56+5:30

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहतूक शाखेकडून विशेश माेहिमेचे अायाेजन करण्यात अाले हाेते. यात विविध नियम माेडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करुन 76 लाखांहून अधिक दंड वसून करण्यात अाला.

trffic pilice fine 13 thousand pepole for riding without helmate | विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या 13 हजार नागरिकांवर कारवाई

विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या 13 हजार नागरिकांवर कारवाई

पुणे : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत राबविलेल्या विशेष माेहिमेमध्ये विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या 13 हजार सहाशे 2 नागरिकांवर वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात अाली अाहे. या कारवाईतून 66 लाख 47 हजार शंभर रुपये इतका दंड वसूल करण्यात अाला अाहे.त्याचबराेबर इतर नियम माेडणाऱ्या वाहनचालकांवरही यावेळी कारवाई करण्यात अाली. 
      पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील अपघातांचे प्रमाण कमी करण्याकरीता व वाहतूक सुरळीत व सुरक्षित चालण्यासाठी वाहतूक शाखेकडून वेगवेगळ्या कलामाखाली विशेष माेहिमेचे अायाेजन केले जाते. त्याप्रमाणे रस्ता सुरक्षा अभियान -2018 च्या अनुषंगाने काही विशिष्ट वाहतुकींच्या नियमांबाबत विशेष माेहिमेचे अायाेजन करण्यात येते. 23 एप्रिल ते 3 मे पर्यंत करण्यात अालेल्या कारवाईत 13 हजार सहाशे 2 नागरिकांवर हेल्मेट न घातल्या कारणामुळे कारवाई करण्यात अाली. त्याचबराेबर जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या 128, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 93, गाडी चालविताना माेबाईलवर बाेलणाऱ्या 2 हजार सातशे पाच, सिट बेल्ट न बांधलेल्या 1 हजार दाेनशे 76, रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या 84 तर ट्रिपल सिट प्रवास करणाऱ्या 987 जणांवर या दरम्यान कारवाई करण्यात अाली. या माेहिमेत एकूण 18 हजार अाठशे 16 वाहतूकीचे नियम माेडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात अाली असून त्यांच्याकडून 76 लाख साठ हजार 100 इतका दंड वसून करण्यात अाला अाहे. 
    पुण्यातील वाहतूकीची समस्या दिवसेंदिवस जटील हाेत चालली अाहे. त्यातच वाहतूकीचे नियम माेडणाऱ्यांची संख्याही अधिक अाहे. त्यामुळे वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेकडून विविध पाऊले उचलण्यात येतात. ही माेहिम यापुढेही चालू राहणार असून नागरिकांनी नियम पाळून पाेलीसांना सहकार्य करावे असे अावाहन वाहतूक शाखेकडून करण्यात अाले अाहे. 
 

Web Title: trffic pilice fine 13 thousand pepole for riding without helmate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.