शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  विनाअनुदानित शिक्षकांची ‘काळी दिवाळी’, सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 17:47 IST

अनुदान देण्यासह निधी घोषित करण्याबाबत शासनाने दिलेले आश्वासन पाळले नसल्याच्या निषेधार्थ विनाअनुदानित शिक्षकांनी मंगळवारी ‘काळी दिवाळी’ साजरी केली. त्यांनी महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शासन आणि सरकारचा निषेध केला.

ठळक मुद्दे विनाअनुदानित शिक्षकांची ‘काळी दिवाळी’, सरकारचा निषेधशिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन

कोल्हापूर : अनुदान देण्यासह निधी घोषित करण्याबाबत शासनाने दिलेले आश्वासन पाळले नसल्याच्या निषेधार्थ विनाअनुदानित शिक्षकांनी मंगळवारी ‘काळी दिवाळी’ साजरी केली. त्यांनी महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शासन आणि सरकारचा निषेध केला.येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे सकाळी साडेदहा वाजता समितीचे पदाधिकारी आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विनाअनुदानित शिक्षक जमले. त्यांनी या कार्यालयासमोर ठिय्या मारला. ‘अनुदान आमच्या हक्काचे’, ‘हम सब एक है’, अशा घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला. सरकार आणि मुख्यमंत्र्यांचा निषेध केला.

झालेल्या निषेध सभेत समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे म्हणाले, नागपूरमधील पावसाळी अधिवेशनामध्ये २० जुलै २०१८ रोजी मुख्यमंत्र्यांनी प्रचलित नियमानुसार १00 टक्के अनुदान देण्याबाबत आणि अघोषित सर्व शाळा निधीसह घोषित करणे याबाबत निर्णय लवकरच घेऊ, असे आश्वासन दिले.

मात्र, अद्यापही या आश्वासनाची पूर्तता शासनाकडून झाली नसल्याने समितीतर्फे मंगळवारी काळी दिवाळी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सुनील कल्याणी, प्रमोद पाटील, सुनील शेंडे, जयंत आसगावकर, दादा लाड, व्ही. जे. पवार, गजानन काटकर, व्ही. एच. सपाटे, प्रकाश पाटील, शिवाजी खापणे, राजेंद्र कोरे, आदी सहभागी झाले.

अन्यथा १९ नोव्हेंबरपासून बेमुदत शाळा बंदप्रचलित नियमानुसार अनुदान देण्यास शासनाने दिरंगाई केल्यास दि. १९ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशन काळामध्ये राज्यात बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्यात येईल. मुंबईतील आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन केले जाणार असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.

कार्यालयाच्या भिंतीवर निवेदन चिकटविलेया आंदोलनाबाबत समितीने गेल्या १0 दिवसांपूर्वी शिक्षण उपसंचालकांना पत्र दिले होते. तरीही मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यास मंगळवारी एकही अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. त्याचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर निवेदन चिकटविले. काळी कपडे परिधान करून, डोक्याला काळी पट्टी बांधून आणि खिशाला काळी फित लावून या आंदोलनात शिक्षक सहभागी झाले. 

 

टॅग्स :Teacherशिक्षकkolhapurकोल्हापूर