शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

कोल्हापूर : डेंग्यू रोखण्यास असमर्थ, मनपाविरुध्द शिवसेनेची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 17:02 IST

डेंग्यूला रोखण्यास महापालिका प्रशासन असमर्थ ठरल्याच्या निषेधार्थ सोमवारी शिवसेनेच्या वतीने आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करुन जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी निष्क्रिय अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, अशी मागणीही शिवसैनिकांनी केला.

ठळक मुद्दे डेंग्यू रोखण्यास असमर्थ, मनपाविरुध्द शिवसेनेची निदर्शनेआयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या

कोल्हापूर : शहरात गेल्या काही महिन्यापासून डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असून महानगरपालिका प्रशासनाची निष्क्रीयता व ढोंगीपणाचे अनेक बळी गेले आहेत व शेकडो रुग्ण बाधित आहेत.

डेंग्यूला रोखण्यास महापालिका प्रशासन असमर्थ ठरल्याच्या निषेधार्थ सोमवारी शिवसेनेच्या वतीने आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करुन जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी निष्क्रिय अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, अशी मागणीही शिवसैनिकांनी केला.गेल्या काही महिन्यापासून कोल्हापूर शहरात डेंग्यू या भयानक रोगाने अक्षरश: दुमाकुळ घातला असून शेकडो जणांना त्याची बाधा झाली आहे. आठ रुग्ण दगावले आहेत. याला महानगरपालिका आरोग्य विभागाची यंत्रणाच जबाबदार आहे.

त्याच्या निषेधार्थ शिवसेने सोमवारी आधी महानगरपालिका मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर निदर्शने केली. नंतर आयुक्त अभिजित चौधरी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या प्रश्नाकडे आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे, आणि शहरातील नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.आयुक्त चौधरी यांनी शिवसैनिकांचे म्हणणे जाणून घेतले. आरोग्य विभागातर्फे स्वच्छता, औषध फवारणी, धूर फवारणी सातत्याने करणे आवश्यक आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयपणामुळे ही साथ पसरलेली आहे, त्या अधिकाऱ्यांना ताबडतोब बडतर्फ करावे, म्हणजे यंत्रणा कामाला लागेल, असे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी आयुक्तांना सांगितले.

शहरात किमान दोन हजार रुग्णांना डेंग्यू झाला असून ते खासगी रुग्णालयातून उपचार घेत आहेत यावरुनच या रोगाचे वास्तव स्पष्ट होते, असेही पवारांनी निदर्शनास आणून दिले.गणेशोत्सव जवळ आलेला आहे. त्यापूर्वी शहरातील सर्व रस्ते, सर्व कोंडाळे, गटारी, नाले साफ करुन घ्यावेत, अशी सुचना शहर प्रमुख दुर्गेश लिंग्रज यांनी केली. शहरातील गांधी मैदानावर मोठ्याप्रमाणात पाणी साचून राहते. शहरातील अनेक मुताऱ्या स्वच्छ केल्या जात नाहीत. बऱ्याच ठिकाणी ड्रेनेजमधील सांडपाणी रस्त्यावर पसरून दुर्गंधी सुटलेली असते याकडे मनपा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष पुरवावे, असे उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी सांगितले.

बांधकाम परवाने रद्द करणार : आयुक्तशहरात वारंवार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून राहते. त्यातून डेंग्यूच्या डासांची निर्माती होत आहे. आम्ही शहरात प्रबोधनाची मोहिम हाती घेतली आहे. घराघरात जाऊन जनजागृती केली जात आहे. प्रत्येक कुटुंबाने खबरदारी घेतली तर डेंग्यूच्या डासांचा बंदोबस्त प्रभावीपणे करता येईल,असे आयुक्त चौधरी यांनी शिवसैनिकांशी बोलतना सांगितले. बांधकाम साईटवर जेथे डेंग्यूच्या डास आळ्या सापडतील त्या बांधकामा व्यावसायिकांना दंड करण्यात आला होता आता परवाने रद्द केली जातील, असेही आयुक्तांनी सांगितले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाShiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूरdengueडेंग्यू