शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : विशाळगडाजवळील गेळवडे जलाशयात दोघेजण बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 16:19 IST

शाहूवाडी तालुक्यातील विशाळगडाजवळील गेळवडे जलाशयात पोहण्यासाठी उतरलेल्या आठजणांच्या तरुणांपैकी दोघेजण पाण्यात बुडाले. शनिवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. गेल्या दोन महिन्यात या जलाशयात बुडण्याची ही तिसरी घटना असून यापूर्वी दोघांचा बळी गेला आहे.

ठळक मुद्देविशाळगडाजवळील गेळवडे जलाशयात दोघेजण बुडालेपर्यटनासाठी आलेल्या तरुणांना पोहणे नडलेदोन महिन्यातील तिसरी घटना

आंबा : शाहूवाडी तालुक्यातील विशाळगडाजवळील गेळवडे जलाशयात पोहण्यासाठी उतरलेल्या आठजणांच्या तरुणांपैकी दोघेजण पाण्यात बुडाले. शनिवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. गेल्या दोन महिन्यात या जलाशयात बुडण्याची ही तिसरी घटना असून यापूर्वी दोघांचा बळी गेला आहे.इजाज पीर अहमद बावली (वय २७) आणि निदाल मलिक बावली (वय १८, दोघेही राहणार लाजगौरी-कर्नाटक) अशी पाण्यात बुडालेल्यांची नावे आहेत.कर्नाटकातील लाजगौरी येथील आठजणांचा गट तवेरा गाडीने पर्यटनासाठी विशाळगड येथे निघाला. सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गेळवडे जलाशयाजवळ ते थांबले. चालकासह सर्वजण या जलाशयात पोहण्याचा आनंद घेत थांबले, पण त्यातील काहीजणांना पाण्याचा अंदाज आला नाही. इतर तरुण पाण्यातून बाहेर पडले, परंतु त्यांच्यातील दोघेजण आढळून आले नाहीत. साथीदारांनी त्यांचा पाण्यात शोध घेतला, पण त्यांचा मागमूसही आढळून आला नाही.तरुणांनी तत्काळ ही माहिती शाहूवाडी पोलिसांना दिली. शाहूवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अनिल गाडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती पाहून त्यांनी बचाव पथकाला पाचारण केले आहे. अद्याप या तरुणांचा मृतदेह मिळून आलेला नाही. शाहूवाडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.गेळवडे जलाशयातील तिसरी घटनाविशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या हा गेळवडेचा जलाशय अतिशय रमणीय आहे. वाटेतच असल्यामुळे भाविकांना आणि पर्यटकांना या जलाशयाची भुरळ पडते. यापूर्वीही या जलाशयात पोहण्यासाठी उतरलेल्यांचा बळी गेला आहे. गेल्या तीन महिन्यातील ही तिसरी घटना असून यापूर्वी दोघांचा बळी गेला आहे. गेळवडे ग्रामपंचायतीनेही या परिसरात या जलाशयात पोहण्यास मनाई असल्याचा आणि तो धोकादायक असल्याचा फलक लावलेला आहे. तरीही उत्साही तरुण येथील पाण्यात उतरतात.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात