शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शिवज्योत मागे-पुढे घेण्यावरून दोन गदात वाद, वादाचे पर्यवसान मारामारीत, परस्परविरोधी गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 18:34 IST

शिवजयंतीनिमित्त माणगांव ता.हातकणंगले येथे शिवज्योत मागे-पुढे घेण्यावरून दोन गटात वाद झाला. या वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. याप्रकरणी दोन गटाविरुध्द परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देशिवज्योत मागे-पुढे घेण्यावरून दोन गदात वादवादाचे पर्यवसान मारामारीतपरस्परविरोधी गुन्हे दाखल

कोल्हापूर/रूकडी-माणगांव : शिवजयंतीनिमित्त माणगांव ता.हातकणंगले येथे शिवज्योत मागे-पुढे घेण्यावरून दोन गटात वाद झाला. या वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. याप्रकरणी दोन गटाविरुध्द परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.प्रतिवर्षी प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील माणगांव येथे शिवजयंती साजरी करण्यात येते. यानिमित्य दुचाकी रॅली काढण्यात येते तसेच शिवज्योत गावातून फिरवून येथील शिवाजी चौकात आणली जाते. येथील एका गटाने शिवज्योत आणली असता दुसऱ्या गटातील युवकांनी शिवज्योतीसमोर आपली गाडी पुढे घातल्यावरून दोन गटात बाचाबाची सुरू झाली.

शब्दाला शब्द वाढत गेल्याने त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. दोन्ही गट समोरासमोर भिडल्याने कोणकोणास मारहाण करीत आहे. एकमेकांच्यावर दगडफेक आणि लाठीमार यामुळे मध्यस्थी करणाऱ्या युवकांनाही याचा तडाखा बसला. यात गंभीर घाव लागून सहा युवकांना खासगी तर इतरांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हाणामारीत दोन्ही गटातील युवक जखमी झाले आहेत.दरम्यान, या प्रकारात येथील एक गटातील तीस ते चाळीस युवक दुसऱ्या गटातील कार्यकर्त्यांच्या घरावर चाल करण्याच्या प्रयत्न करीत होते, मात्र सामाजिक कार्यकर्ते अनिल जगदाळे यांनी या युवकाना रोखले, यामुळे पुढील अनर्थ टळला.

पोलीस पाटील करसिध्द जोग यांनी या घटनेची वर्दी हातकणंगले पोलिस ठाण्यात देताच तेथे तत्काळ राखीव दल दाखल झाल्याने वातावरण निवळले. गुन्ह्यात वापरण्यात आलेले तलवारी, गज आणि काठी जप्त करण्यात आले आहे.

गुन्हात सहभागी असलेल्याचे उशीरापर्यत धरपकड सुरू होते. मारामारीत उमेश कोळी, रमेश कोळी, संतोष उर्फ गुंडा जाधव, बाळासो तांदळे, सूरज तादळे, दत्ता बनने, राजू जगदाळे हे जखमी झाले आहेत.

याची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली असून गुन्हा दाखल करण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते. पोलिस निरीक्षक सी. एल. डुबल, निरीक्षक रनगर, विजय घाटगे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

टॅग्स :Shivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर