शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : मोटसायकलची समोरासमोर धडक; कासारवाडी घाटात अपघात, दोन ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 22:49 IST

कासारवाडी घाटात मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन्ही मोटारसायकल स्वार जागीच ठार झाले आहेत.

शिरोली : कासारवाडी घाटात मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन्ही मोटारसायकल स्वार जागीच ठार झाले आहेत. यात दिव्यांग जिल्हाध्यक्ष नारायण तुकाराम मडके वय.४०, रा. मादळे,ता.करवीर), अनिल बाबुराव वरुटे (वय.४२,रा. कासारवाडी, ता. हातकणंगले) यांचा समावेश आहे. हा अपघात सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास कासारवाडी कुरुण शिवारात घडला.

अधिक माहिती अशी अनिल वरुटे हे सादळे येथील फार्म हाऊसवर कामाला आहेत. तिथेच त्यांचा रसवंतीचा‌ व्यवसाय आहे. ते व्यवसायानिमित्त परिवारासह सादळे येथे राहतात. मुलगी कासारवाडी हायस्कूल मध्ये शिक्षण घेते सोमवारी रात्री सातच्या सुमारास सादळे येथून मुलगीला कासारवाडीतून आणण्यासाठी ते जात होते.‌ याच वेळी टोपहून सादळे मादळेला नारायण मडके हे आपल्या हॅंडीकॅप दुचाकीवरून घरी जात होते. कासारवाडी घाटात दोन्ही मोटारसायकलींची जोरात धडक होऊन अपघात झाला.‌ हा अपघात इतका भीषण होता की दोघांच्याही डोक्याला मार लागला.

अपघात झाल्याचे समजताच कासारवाडी आणि सादळे मादळे येथील सरपंच अच्युत खोत, पंडित बिडकर आणि स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी दोघांना तात्काळ उपचारासाठी कोल्हापूर मधील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सीपीआर मध्ये दोन्ही गावातील लोकांनी मोठी गर्दी केली होती या घटनेमुळे कासारवाडी आणि सादळे मादळे गावात शोककळा पसरली होती. दोघांच्या वर रात्री उशिरा अत्यंत संस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील करत आहेत. 

दोघांची ही परिस्थिती बेताचीच कासारवाडी अपघातात ठार झालेल्या अनिल वरुटे यांच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा, मुलगी आणि आई वडील असून ते दुसऱ्यांच्या फार्म हाऊसवर कामाला होते. तर नारायण मडके हे दिव्यांग असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात