शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : भाविकांचे मोबाईल चोरणाऱ्या कर्नाटकातील दोन महिला चोरट्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 12:50 IST

कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिर आणि भवानी मंडप परिसरात भाविकांचे मोबाईल आणि दागिने चोरणाऱ्या कर्नाटकातील दोन सराईत महिला चोरट्यांना भाविकांनी रंगेहात पकडून राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयित रूपा रामु बजंत्री (वय २२), रक्षा मनोज गायकवाड (२५, दोघी. रा. हुबळी-कर्नाटक) अशी त्यांची नावे आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूर : भाविकांचे मोबाईल चोरणाऱ्या कर्नाटकातील दोन महिला चोरट्यांना अटकअकरा हजार किमतीचा मोबाईल जप्त : भवानी मंडप परिसरातील घटना

कोल्हापूर : येथील अंबाबाई मंदिर आणि भवानी मंडप परिसरात भाविकांचे मोबाईल आणि दागिने चोरणाऱ्या कर्नाटकातील दोन सराईत महिला चोरट्यांना भाविकांनी रंगेहात पकडून राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयित रूपा रामु बजंत्री (वय २२), रक्षा मनोज गायकवाड (२५, दोघी. रा. हुबळी-कर्नाटक) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून चोरीचा मोबाईल जप्त केला.अधिक माहिती अशी, अंबाबाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. या ठिकाणी गर्दीचा फायदा घेत अनेकवेळा भाविकांची पाकिटे, पर्स, मोबाईल चोरीला गेले आहेत. संतोष इराप्पा बेळगावे (वय ३३, रा. सांगलीवाडी, जि. सांगली) हे कुटुंबासह अंबाबाई दर्शनासाठी आले होते. भवानी मंडप परिसरात त्यांच्या खिशातील मोबाईल चोरीला गेला. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता तो मिळून आला नाही.

देवस्थान समितीच्या सीसीटीव्ही फुटेजवरून शोध घेतला असता, दोन महिला मोबाईल चोरताना दिसून आल्या. सीसीटीव्ही सुरक्षा नियंत्रक राहुल जगताप व सुरक्षा अधिकारी संदीप साळोखे यांनी शिताफीने त्यांना भवानी मंडप परिसरात फिरत असताना पकडून राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.

या महिलांनी वेळोवेळी गर्दीचा फायदा घेत चोऱ्या केल्याचे पुढे आले आहे. त्यांची टोळी असून आणखी काही साथीदारांचा समावेश आहे. राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मानसिंग खोचे अधिक तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर