शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : रामानंदनगरातील दोघा चेन स्नॅचरना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 11:28 IST

दुचाकीवरून भरधाव वेगाने येऊन महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसडा मारून लांबविणाऱ्या दोघा चेन स्नॅचरच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आवळल्या.

ठळक मुद्देदीड लाखाचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त दोन दुचाकीसह अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

कोल्हापूर : दुचाकीवरून भरधाव वेगाने येऊन महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसडा मारून लांबविणाऱ्या दोघा चेन स्नॅचरच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आवळल्या.

पंकज प्रताप भोसले (वय ३०), साईनाथ मनोहर शिरदवाडे (वय २७, दोघेही रा. ७८५/५, पोवार कॉलनी, रामानंदनगर, कोल्हापूर) अशी अटक केलेल्या दोघा चोरट्यांची नावे असून, त्यांनी हॉकी स्टेडियम, रामानंदनगर, पाचगाव या परिसरांत केलेले सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

त्यांच्याकडून सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किमतीची ७० ग्रॅम वजनाची सात मंगळसूत्रे व दोन दुचाकी असा सुमारे २ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांना न्यायालयाने दि. २७ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश देण्यात आले आहेत.या चोरीप्रकरणी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. शहर, उपनगरांसह जिल्ह्यात विविध ठिकाणी पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसडा मारून नेऊन पोबारा करणाºया चेन स्नॅचरनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले होते.या चोरट्यांच्या शोधमोहिमेबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन चेन स्नॅचरना पकडण्यासाठी व्यूहरचना केली. त्यानुसार जानेवारी २०१८ पासून घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन गुन्हा घडलेल्या ठिकाणी वारंवार भेटी देऊन गोपनीय बातमीदारामार्फत चोरट्यांचा माग काढला. त्यानुसार चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.

सराफ दुकानानजीक चेन स्नॅचरना पकडलेदुचाकीवरून गुजरीत एका सराफाकडे दागिने विक्रीसाठी दोन युवक येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी सापळा रचून भोसले व शिरदवाडे यांना पकडले. त्यावेळी त्यांच्याकडून चोरीतील दागिने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली.

गुन्ह्याची ठिकाणेआर. के.नगर सहजीव हौसिंग सोसायटी, हॉकी स्टेडियम येथील विश्वपंढरी नगरी, रामानंद नगर ते पाचगाव, आय.टी.आय. ते नाळे कॉलनी, नागाळा पार्क, हनुमाननगर ते पाचगाव या रोडवर दोघांनी महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास केले.

चोरटे आतेभाऊपंकज भोसले व साईनाथ शिरदवाडे हे नात्याने आतेभाऊ असून त्यांनी चैनीसाठी हे गुन्हे केल्याचे पोलिसांसमोर कबूल केले.

या महिलांचे दागिने लुटलेकुसुम विठ्ठल साळवी (रा. दीपलक्ष्मी, द्वारकानगर, पाचगाव), सई अमोल देसाई (रा. योगेश्वर कॉलनी, पाचगाव), फराना अनिस शेख (रा. खंडोबा देवालय, रामानंदनगर,), पूनम संदीप साबळे (रा. ७३१, नाळे कॉलनी), मीरा सागर कुलकर्णी (रा. हनुमाननगर, पाचगाव रोड), सुचिता यशवंत गाडगीळ (रा. यशोदा अपार्टमेंट, नागाळा पार्क) या महिलांची मंगळसूत्रे चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर