शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : चोकाक येथे कंटेनर-स्कूल बसची धडक, दोन जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 12:26 IST

कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर चोकाक येथे (ता हातकणंगले) कंटेनर व स्कूल बसची धडक होवून बसला चुकविण्याच्या प्रयत्नात कंटेनर उलटल्याने कंटेनर चालक व वाहक दोघेजण जागीच ठार झाले. तर स्कूल बस मधील १६ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देचोकाक येथे (ता हातकणंगले) कंटेनर व स्कूल बसची धडक कंटेनर चालक व वाहक दोघे जागीच ठार, १६ विद्यार्थी गंभीर जखमी

कोल्हापूर/हेरले : कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर चोकाक येथे (ता हातकणंगले) कंटेनर व स्कूल बसची धडक होवून कंटेनर चालक व वाहक दोघेजण जागीच ठार झाले. तर स्कूल बस मधील १६ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. प्राथमिक माहितीनुसार मृतामध्ये सुरेश खोत ( रा. कवठेमहाकाळ), आणि सचिन खिलारी (रा.शेणवडे ता. माण, जि. सातारा) यांचा समावेश आहे, अशी माहिती लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली. 

घटनास्थळावरून आणि पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी सांगलीहून कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने कंटेनर येत होता. याच वेळी संजय घोडावत स्कूलची बस गांधीनगरहुन मुलांना घेऊन अतिग्रेच्या दिशेने चालली होती.

यावेळी सांगलीहून कोल्हापूरच्या दिशेने येणारा कंटेनर डिव्हाडर फोडून विरुद्ध दिशेला घुसल्याने अतिग्रेच्या दिशेने जाणारी  स्कूल बसची आणि कंटेनरची धडक झाली. या अपघातात कंटेनर चालक व वाहक दोघेजण जागीच ठार झाले, तर स्कूल बस मधील १६ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.  

दोन तास वाहतूक कोंडीकंटेनर आणि स्कूल बसचा अपघात सकाळी साडे आठच्या सुमारास घडला. या अपघातानंतर कोल्हापूर सांगली राज्यमार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली होती. सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. हातकणंगले पोलीस ठाण्याचे कर्मचारी आल्यावर वाहतूक सुरळीत झाली. 

स्थानिक लोकांचे मदत कार्यस्कूल बसचा अपघात झाल्याचे समजताच  चोकाक, माले , हेरले येथील स्थानिक लोकांनी बस मधून विद्यार्थांना बाहेर काढण्याचे मदत कार्य नंदकुमार पाटील, सचिन कुंभार, बापूसो पाटील, अजित पाटील तसेच घटनास्थळाला , हातकणंगले माजी सभापती राजेश पाटील, माजी सरपंच बालेचॉद जमादार, तात्काळ आले होते. 

चालकाच्या प्रसंगावधानाने मुले वाचलीस्कूल बसचा चालक जयसींग चौगुले (मुरगुड) यांच्या प्रसंगावधानाने मुले वाचली. स्कूल बस अतिग्रेच्या दिशेने जात असताना चोकाक फाटा येथे डिव्हायडर तोडून कंटेनर उलट्या दिशेने आला, हे बस  चालक जयसींग चौगुले याच्या लक्षात आल्यावर त्यांनी बस शेजारच्या शेतात घातली. चौगुले यांनी प्रसंगावधान दाखवले नसते तर मोठा अपघात झाला असता. यामध्ये चौगुले गंभीर जखमी झाले आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जखमीची विचारपुस केली.

साडे आठच्या सुमारास अपघात संजय घोडावत स्कूलच्या बसमध्ये २५ विद्यार्थी होते. ही बस चिंचवाड, वळीवडे, गांधीनगर, तावडे हॉटेल मार्गावरील पंचवीस विद्यार्थी घेऊन सकाळी आठ वाजता बाहेर पडली होती. ही बस अतिग्रेच्या दिशेने जात असताना साडे आठच्या सुमारास हा अपघात घडला. 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर