शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : स्वत:ला चाकूने भोसकून वृद्धेचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 11:48 IST

दीर्घ आजारास कंटाळून एका वृद्ध महिलेने धारदार चाकू स्वत:च्या पोटात भोसकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवार पेठेतील अकबर मोहल्ला येथे घडली.

ठळक मुद्दे स्वत:ला चाकूने भोसकून वृद्धेचा आत्महत्येचा प्रयत्नअकबर मोहल्ला येथील घटना : पोटात चाकू अडकलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल

कोल्हापूर : दीर्घ आजारास कंटाळून एका वृद्ध महिलेने धारदार चाकू स्वत:च्या पोटात भोसकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी दुपारी सोमवार पेठेतील अकबर मोहल्ला येथे घडली.

जुबेदा इब्राहिम पठाण (वय ६५) असे या वृद्धेचे नाव आहे. त्यांना पोटात चाकू अडकलेल्या गंभीर अवस्थेत शेजाऱ्यांनी व नातेवाइकांनी उपचारासाठी तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केल्याने सुदैवाने त्यांचे प्राण वाचले.याबाबत माहिती अशी की, अकबर मोहल्ला येथे जुबेदा पठाण या आपला मुलगा, सून, नातवासह राहतात. बुधवारी दुपारी त्यांचा मुलगा इरफान पठाण हे नोकरीनिमित्त घराबाहेर पडले होते. त्यांच्या सूनही घरी नव्हत्या. घरी कोणीही नसल्याचे पाहून जुबेदा पठाण या वृद्धेने आपल्या उजव्या हातावर धारदार चाकूने वार करून घेतले, त्यानंतर तोच चाकू त्यांनी आपल्याच पोटात खुपसला. तो चाकू त्यांच्या पोटातच अडकून राहिला.

त्यावेळी प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्या जमिनीवर बेशुद्ध पडल्या. त्यानंतर काही वेळाने त्यांचा १७ वर्षीय नातू घरी आला. त्यावेळी घरचा दरवाजा बंद होता. त्याने दरवाजा उघडून आत पाहिले असता आजी जुबेदा पठाण ह्या जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडल्या होत्या.

त्याने आरडाओरडा केला. त्यानंतर जमलेल्या नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी त्यांना पोटात चाकू अडकलेल्या अवस्थेतच तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करून चाकू काढण्यात आला; पण त्या अत्यवस्थ आहेत.

दीर्घ आजारास कंटाळून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत रात्री उशिरापर्यंत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर