शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राष्ट्रीय पोषण अभियानात कोल्हापूर देशात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 20:27 IST

केंद्र शासनाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पोषण अभियानामध्ये सर्वाधिक म्हणजे पाच वैयक्तिक पुरस्कार पटकावत कोल्हापूर जिल्ने देशात बाजी मारली आहे. विशेष म्हणजे या अभियानामध्ये ७७ पैकी १४ पुरस्कार मिळवून

ठळक मुद्देमहाराष्ट्र देशात पहिलेदेशभर सप्टेंबर महिना हा ‘पोषण माह’ म्हणून साजरा

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पोषण अभियानामध्ये सर्वाधिक म्हणजे पाच वैयक्तिक पुरस्कार पटकावत कोल्हापूर जिल्ने देशात बाजी मारली आहे. विशेष म्हणजे या अभियानामध्ये ७७ पैकी १४ पुरस्कार मिळवून महाराष्ट्र देशात पहिले आले आहे.

राजश्री सयाजी साळसकर (अंगणवाडी सेविका माले, ता. पन्हाळा), शोभा महादेव लोहार (आशा), वैशाली भास्कर शितोळे (परिचर), स्मिता सदानंद चोपडे (पर्यवेक्षिका, केखले प्राथमिक आरोग्य केंद्र, ता. पन्हाळा), संध्या उल्हास चांदणे (आरोग्य सहाय्यिका, चिखली प्राथमिक आरोग्य केंद्र, ता. कागल) या पाच महिला कर्मचारी वैयक्तिक पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.

देशभर सप्टेंबर महिना हा ‘पोषण माह’ म्हणून साजरा करण्यात आला. पोषण चळवळ जनचळवळ व्हावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या महिन्यात जिल्हाभरामध्ये पोषण मेळावे, पाककृती स्पर्धा, किशोरी मुली आणि महिलांचे हिमोग्लोबिन तपासणे, गृहभेटी, पोषण पंगती, पोषण दहीहंडी, फळाफुलांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.

या सर्व कार्यक्रमांची नोंद केंद्र शासनाच्या संबंधित संकेतस्थळावर करण्यात आली होती. यातून गावपातळीवर उत्कृष्ट काम करणाºया अंगणवाडी सेविका, आशा, परिचर,आरोग्य पर्यवेक्षिका, सहाय्यिका यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती वंदना मगदूम, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, खातेप्रमुख, बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस, आशा, ग्रामपंचायत यंत्रणा या सर्वांच्या सहकार्यातून जिल्हा परिषदेच्या या कर्मचाºयांनी हे यश मिळविले आहे.योजनेत समावेश नसताना मिळविले यशवास्तविक शालेय पोषण अभियानामध्ये कोल्हापूर जिल्'ाचा समावेश नाही. महाराष्ट्रातील २0 जिल्हे या योजनेत आहेत. कोल्हापूरचा तिसºया टप्प्यात समावेश होणार आहे. त्यामुळे यासाठी कोणताही निधी जिल्हा परिषदेला उपलब्ध नव्हता. तरीही कोल्हापूर जिल्हा परिषदेने चौदावा वित्त आयोग आणि लोकसहभागातून हे सर्व उपक्रम राबवून त्यामध्ये सर्वाधिक वैयक्तिक पुरस्कार पटकावण्याची कामगिरी केली हे विशेष.

या पाच महिला कर्मचारी वैयक्तिक पुरस्काराच्या मानकरी

  1. राजश्री साळसकर
  2. शोभा लोहार
  3. वैशाली शितोळे
  4. स्मिता चोपडे
  5. संध्या चांदणे

 

जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाने चांगली कामगिरी करून दाखविली आहे. सभापती वंदना मगदूम आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, त्यांच्या पथकाने सामूहिक शक्तीची प्रचिती आणून दिली. या पाचही महिलांचे मनापासून अभिनंदन. त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेची मान आणखी उंचावली आहे.शौमिका महाडिकअध्यक्षा, जिल्हा परिषद, कोल्हापूर 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर